Ambadas Danve Latest News Sarkarnama
मराठवाडा

Danve On PM Modi : मोदी अन् भाजपचे प्रेम कधीच निर्मळ नव्हते, दानवे असं का म्हणाले ?

Ambadas Danve Latest News : आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे, ही इच्छा बाळगण्यात गैर नाही, पण देशाच्या पंतप्रधानांनी देशाला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे, असा काहीसा नाराजीचा सूर गेल्या काही वर्षांपासून देशात विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसला.

Jagdish Pansare

Chhatrapati Sambhajinagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात प्रेम काही लपून राहिलेले नाही. गुजरातचे मुख्यमंत्री राहिलेले मोदी जेव्हा लोकसभा निवडणूक लढवायला निघाले तेव्हाही भाजपच्या प्रचारात गुजरात मॉडेलचा वापर केला. देशात जे काही चांगल ते सर्वात आधी गुजरातला नेण्याचा त्यांच्या प्रयत्न राहिला आहे.

आपल्या राज्याचा विकास झाला पाहिजे, ही इच्छा बाळगण्यात गैर नाही, पण देशाच्या पंतप्रधानांनी देशाला सर्वप्रथम प्राधान्य दिले पाहिजे, असा काहीसा नाराजीचा सूर गेल्या काही वर्षांपासून देशात विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणात उमटताना दिसला.

मोदींच्या गुजरात प्रेमाचे ताजे उदाहरण म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गुजरातच्या गेमझोनमध्ये आग लागून बळी गेलेल्या मृतांच्या नातेवाईकांना घोषित केलेल्या मदतीचे दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेम झोनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.

या कुटुंबांना मदत केल्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु हीच मदत मोदींनी महाराष्ट्राची आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील डोंबिवली भागात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत का दिली नाही, असा सवाल शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्विटच्या माध्यमातून उपस्थितीत केला.

गुजरातेत राजकोट येथे झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 लाख प्रत्येकी अशी मदत घोषित केली आहे. घाटकोपर होर्डिंग आणि डोंबिवली स्फोटातील लोकांना मात्र अशी मदत करायचे त्यांना सुचले नाही. महाराष्ट्राप्रति भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रेम कधीच निर्मळ नव्हते, याचा हा अजून एक नमुना.

फायन वादळाने झालेल्या नुकसानीकडे त्यांनी ढुंकून पाहिले नाही. मराठवाड्यातील दुष्काळ पाहण्यासाठी चमू पाठवण्याचे ढोंग केले. पावसाळा तोंडाशी आला तरी एक दमडी येथील शेतकऱ्यांना त्यांनी दिली नाही. पण महाराष्ट्रातील भाजप, 'वाकेन पण मोडणार नाही' चे प्रणेते शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि अर्थमंत्री महोदय यावर काहीच बोलणार नाहीत, अशी टीका दानवे यांनी या निमित्ताने केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT