छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची सभा सुरू होण्यापूर्वीच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांना सुनावले. आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस आमचा राहील. सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून पोलिसांनी जास्त मस्ती करू नये. ही मस्ती जिरवून दाखवू, अशा शब्दांत दानवे यांनी पोलिसांना फटकारले. (Ambadas Danve warned the police in stern words)
महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा आज (ता. २ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे झाली. त्या सभेपूर्वी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गाड्या न सोडणाऱ्या पोलिसांना कठोर शब्दांत फटकारले.
अंबादास दानवे म्हणाले की, माझी पोलिसांना विनंती आहे. महाविकास आघाडीच्या सभेला येणाऱ्यांना जुबली पार्कजवळ येऊ द्यायचं, हे आपलं आधीच ठरलं होतं. पण, किमान ८०० गाड्या आत्ता बाबा पेट्रोल पंपाजवळ उभ्या आहेत. आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस आमचा राहील, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो.
सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून पोलिसांनी जास्त मस्ती करू नये, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. आपलं बैठकीत ठरलं होतं. पण, आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या केम्ब्रिज शाळेजवळ थांबवल्या आहेत. जालना रस्त्यावरून त्या गाड्या शहरात घेण्याचं ठरलं होतं, पण तुम्ही झालटा फाट्यावरून त्या गाड्यात पाठवता. पोलिसांना फार मस्ती आली असेल, तर जिरवून दाखवू, हेही मी तुम्हाला सांगून ठेवतो. गाड्या थांबवू नका, अशी माझी पोलिसांनाही विनंती आहे, असे दानवे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.