MVA Sabha : वॉटर ग्रीड प्रकल्प केंद्राकडे ढकलून फडणवीसांनी ९ मार्चलाच मराठवाड्याला एप्रिल फुल बनविले : धनंजय मुंडे बरसले

या सरकारच्या विरोधात बोलले, तर कधी पोलिस घरात येतील, हे सांगता येत नाही.
Dhananjay-Munde
Dhananjay-MundeSarkarnama

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नऊ मार्च रोजी पंचामृत नावाने मांडलेला अर्थसंकल्प हा एप्रिल फूलच होता. त्यादिवशी विविध घोषणा करून राज्य सरकारने नऊ मार्चलाच आपला एप्रिल फूल केला. याच अर्थसंकल्पात मराठवाड्याचा महत्वकांक्षी वॉटर ग्रीड प्रकल्प जो राज्य सरकार करणार होता. तो प्रकल्प केंद्र सरकारकडे ढकलून मराठवाड्यातील सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसून या सरकारने नऊ मार्चलाच मराठवाड्याला एप्रिल फूल केले आहे, अशा शब्दांत माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. (Devendra Fadnavis made Marathwada an April Phul on March 9 only : Dhananjay munde)

महाविकास आघाडीची पहिली वज्रमूठ सभा आज (ता. २ एप्रिल) छत्रपती संभाजीनगर येथे झाली. त्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे भाषण झाले. ते म्हणाले की, एक एप्रिल रोजी चेष्टेचा दिवस साजरा केला जातो. मला एप्रिल फूलच्या दिवसाची चेष्टा आणि महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेची चेष्टा नऊ एप्रिलच्या अर्थसंकल्पातच दिसली होती.

Dhananjay-Munde
Rahul Gandhi News : राहुल गांधींची खासदारकी वाचणार का? : सूरत सत्र न्यायालयात उद्या आव्हान देणार

धनंजय मुंडे म्हणाले की, औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. गेल्या दहा वर्षांतील राजकारण पाहिलं. सन २०१४ पासून निवडणुकांत कोणती भूल झाली असेल तर कमळाला दिलेले मतदान ही आहे, हे देशातील जनतेने आता ओळखले आहे. त्यामुळे भाजपचा वर्धापन दिन सहा एप्रिल नाही तर १ एप्रिल झाल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे.

Dhananjay-Munde
Mahavikas Aghadi : जलील यांना चुकून निवडून आलेले खासदार म्हणत खैरेंनी ठोकला शड्डू!

या सरकारच्या विरोधात बोलले, तर कधी पोलिस घरात येतील, हे सांगता येत नाही. सरकारला चोर म्हटलं तर कधी आपलं सदस्यत्व जाईल, हे सांगता येत नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाने विधान केले कुठे आणि निकाल लागला कुठं आणि लोकसभा सदस्यत्व रद्द झालं कुठं. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न होतो आहे, असेही धंनजय मुंडे म्हणाले.

मराठवाड्याच्या या भूमीतून उठलेली ही वज्रमूठ महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुकीत एक राहणार आहे. सरकारकडून आश्वासने, दिलेले शब्द पाळले जात नाहीत. सरकारवर टीका केली तर त्याला जोरदार उत्तर मिळतं. कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्रबद्दल वाचाळ बडबड करतो आणि येथील मुख्यमंत्री त्याला उत्तर देऊ शकत नाहीत, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे. महाराष्ट्राचे सरकार हे दिल्लीश्वर, कर्नाटक, गुजरातपुढे झुकणारं आहे. त्यामुळे आपली वज्रमूठ ताकदीने उभी करू की महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना मराठवाड्याच्या मातीत गाडू, असा संकल्प आपण करू.

Dhananjay-Munde
Shivsena News : शिवसेनेचा राम म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हाप्रमुखांचा अखेर ‘जय महाराष्ट्र’ : भाजपत प्रवेश करणार

देशाला १९४७ ला स्वातंत्र मिळाले. पण त्यानंतर वर्षभरानंतर मराठवाड्याची मुक्तता झाली. ज्या ज्यावेळी दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहिले, त्या त्या वेळी दिल्लीश्वराला या मातीत गाडण्याची ताकद मराठवाड्यात आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला घाबरून मुख्यमंत्र्यांची यात्रा सुरू होत आहे, अशी टीकाही धंनजय मुंडेंनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com