Congress News : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी चर्चेत असलेल्या नावापैकी एक म्हणजे अमित देशमुख. पण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाने फुगलेला काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने फुटला. याचे खापर राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोले यांच्या माथी फुटले. राजीनामा देण्यास त्यांना भाग पाडले गेले आणि त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ या नव्या चेहऱ्याला संधी देत राहुल गांधी यांनी सगळ्यानाच सुखद धक्का दिला.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसला (Congress) मिळालेल्या यशात नाना पटोले यांचा मोठा वाटा असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात. आता त्यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून उचलबांगडी झाली आणि या शर्यतीत धावण्याची इच्छा नसलेल्या अमित देशमुख यांना नाना पटोले हे उर्जावान नेते वाटू लागले आहेत. नाना पटोले यांच्याबद्दल अमित देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.काँग्रेस पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले जी ऊर्जावान नेते आहेत.
आपल्या आक्रमक शैलीतून त्यांनी पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण केले आहे, सर्वच समाज घटकांचे प्रश्न अत्यंत पोटतिडकिने मांडून ते सोडवण्यासाठी शासनाला त्यांनी भाग पाडले आहे. (Amit Deshmukh) त्यामुळे काँग्रेस पक्षाबद्दल समाजात आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
आगामी काळातही त्यांचे मार्गदर्शन कायमपणाने मिळत राहील, त्यांची क्षमता लक्षात घेता त्यांच्यावर आणखीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. त्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा,असे म्हणत त्यांनी नाना पटोले यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
काँग्रेसला पूर्व वैभव प्राप्त होईल..
नाना पटोले यांचे कौतुक करतनाचा नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकळा यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाला पूर्व वैभव प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त करत अमित देशमुख यांनी त्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी उत्तम संघटन कौशल्य असलेले, माजी आमदार हर्षवर्धन जी सपकाळ आपली निवड झाली आहे, त्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन.
आपल्या कारकिर्दीस हार्दिक शुभेच्छा, राज्यातील सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सामाजिक एकोपा जोपासत विकास प्रक्रिया राबवण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण, राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या कारकिर्दीत घडेल. आणि यातून महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला पूर्व वैभव प्राप्त होईल, पक्ष नेतृत्वाने आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरेल हा विश्वास वाटतो, असेही अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.