Solapur Congress : महाराष्ट्र काँग्रेसला नवा कॅप्टन मिळाला; सोलापूरला कधी मिळणार?

Congress News : विधानसभा निवडणुकीनंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून हे पद रिक्त आहे, त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची प्रतीक्षा आतातरी संपणार का, असा सवाल उपस्थित आहे.
Solapur Congress
Solapur Congress Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 14 February : विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर काॅंग्रेसने महाराष्ट्राच्या संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा हर्षवर्धन सकपाळ यांच्या खांद्यावर सोपवली आहे, त्यामुळे राज्यातील संघटनेतही मोठ्या प्रमाणात बदल होण्याची शक्यता आहे. पटोलेंमुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी सपकाळ यांची नियुक्ती झाली. मात्र, सोलापूरच्या रिक्त जिल्हाध्यक्षपदी कधी आणि कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, तेव्हापासून हे पद रिक्त आहे, त्यामुळे सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदाची प्रतीक्षा आतातरी संपणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित आहे.

लोकसभेतील यशामुळे विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला (Congress) ‘अच्छे दिन’ येतील, अशी पक्षश्रेष्ठींसह कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र, काॅंग्रेस पक्षाला नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर खडबडून जागे झालेल्या काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी पक्षसंघटनेत मोठे फेरबदल करण्यास सुरवात केली आहे. त्यातूनच प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सकपाळ यांच्याकडे देण्यात आली आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या नियुक्तीनंतर राज्यातील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल होण्याचे संकेत आहेत. त्यातून जिल्ह्यांच्या कार्यकारिणीची पुनर्रचना होणार आहे. त्यामुळे नव्या आणि तरुणांना पक्षसंघटनेत संधी मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राजीनामा दिला आहे. तेव्हापासून काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे.

Solapur Congress
Ajit Pawar : विरोधकांसह स्वकीयांना अजित पवारांचा दे धक्का? धनंजय मुंडेंच्या कारवाईवर थेट रोखठोक भूमिका

सोलापूर काँग्रेसच्या कार्याची धुरा सध्या कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार पवार यांच्याकडे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापुरात काँग्रेसला कर्णधाराची गरज आहे. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळण्याची शक्यता असताना स्थानिक नेतृत्वामुळे पक्षाला जिंकण्याची शक्यता असतानाही काही जागांवर पाणी सोडावे लागले होते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जिल्हाध्यक्षपदी नव्या चेहऱ्याची गरज आहे.

Solapur Congress
Solapur Politic's : राम सातपुतेंची मोठी खेळी; रणजितसिंहांना शह देण्यासाठी उपसले ‘मोहिते पाटील अस्त्र’!

सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी सुरेश हसापुरे हे इच्छूक आहेत. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात त्यांना काम दाखवावे लागणार आहे. मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून पक्षापासून अंतर राखले होते. विधानसभेत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे एकीकडे तर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील एकीकडे होते, त्यामुळे सर्वांना बरोबर घेऊन चालणारा नेता काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष म्हणून नेमावा लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com