Abdul Sattar Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Abdul Sattar News : मंत्री सत्तारांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांकडून होळी

Anger is growing in the constituency against Minister Abdul Sattar : गावातील शेकडो महिलांना अब्दुल सत्तार यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून साड्या वाटण्यात आल्या. मात्र आज अचानक गावातील महिलांनी एकत्र येत या सगळ्या साड्यांची होळी केल्याने एकच खळबळ उडाली.

Jagdish Pansare

Marathwada Political News : मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात रोष वाढत असल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्यावतीने गावागावात महिलांना साड्यांचे वाटप सुरू आहे. या शिवाय विविध योजनांचा लाभ देण्यासाठी स्वतः अब्दुल सत्तार आणि त्यांची दोन्ही मुलं सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ पिंजून काढत आहेत. नुकताच मतदारसंघातील वांगी बुद्रुक गावात साड्या वाटपांचा कार्यक्रम घेण्यात आला होता.

गावातील शेकडो महिलांना अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे छायाचित्र असलेल्या पिशव्यांमधून साड्या वाटण्यात आल्या. मात्र आज अचानक गावातील महिलांनी एकत्र येत या सगळ्या साड्यांची होळी केल्याने एकच खळबळ उडाली. महिलांच्या संतापामागे एक वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनूसार नवरात्रोत्वानिमित्त गावातील मंदिरात एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्याख्यान देणारी व्यक्ती बांगलादेशात हिंदू महिलांवर कसे अत्याचार होत आहेत, हे सांगत होता.

तेवढ्यात एका महिलेने आमच्या समाजाची बदनामी का करता ? असे म्हणत मंदिरात गोंधळ घातला. काही महिलांनी तिला विरोध करत हुसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा या महिने तुम्हाला अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्या कशा चालतात ? असे म्हणत आरडाओरड केली. यानंतर बराच गोंधळ उडाला आणि गावातील महिलांनी एकत्रित येत सत्तार यांनी वाटप केलेल्या साड्यांची सामुहिक होळी करण्याचा निर्णय घेतला.

त्यानूसार गावातील मंदिरासमोर जमत महिलांनी सगळ्या साड्या एकत्र करुन त्या पेटवून देत घोषणाबाजी केली. तसेच ज्या ज्या गावात अशा प्रकारे मंत्री अब्दुल सत्तार यांनी साड्यांचे वाटप केले असेल तिथे सामुहिक होळी करा, असे आवाहन संतप्त महिलांनी केले. (Shivsena) या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील वातावरण तापले आहे.

कुरघोडीच्या राजकारणातून महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना-भाजप या दोन मित्र पक्षांमध्येच जुंपली आहे. ऐकमेकांच्या विरोधात मोर्च काढल्यानंतर सत्तार व त्यांचे चिरंजीव समीर यांना अनेक ठिकाणी विरोध होताना पहायला मिळत आहे. काही दिवसापुर्वी मतदारसंघातील एका धोतरा गावात समीर सत्तार यांच्या सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीला धक्का मारून खाली पाडल्यामुळे गावकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली होती.

तसेच समीर सत्तार यांना धक्काबुकी करत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला होता. तर सत्तार यांना जाहीर कार्यक्रमात तुम्ही जातीयवाद करता? विकास कामे रोखता? असा आरोप करत माजी सरपंचाने गोंधळ घातला होता. त्यानंतर महिलांकडून साड्यांची होळी झाल्याने अब्दुल सत्तार यांची डोकेदुखी वाढणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT