Jalna Political News : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दोन दिवसाचा जालना अन् छत्रपती संभाजीनगर दौरा केला. तेव्हाच आता कोणाचा नंबर लागणार? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. अखेर घडलेही तसेच, ज्या रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहारातील घोटाळ्यात अर्जुन खोतकर अडचणीत सापडले होते, तेच प्रकरण अंजली दमानिया यांनी पुन्हा बाहेर काढले.
ईडीची पिडा टाळण्यासाठी खोतकर यांनी जड अंतकरणाने उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला होता. (Jalna) त्यानंतर रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदी-विक्री प्रकरण आणि त्यात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपाची फाईल, बंद करण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर पुन्हा आमदार झाल्याने ते जुने प्रकरण नव्याने समोर येण्याची शक्यताही मावळली.
अशावेळी दमानिया (Anjali Damania) यांनी जालन्याचा दौरा केला आणि या कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांची भेट घेत या प्रकरणाला नव्याने हवा दिली. रामनगर सहकारी साखर कारखाना खरेदीतील घोटाळा प्रकरणी एप्रिल महिन्यात लढा उभारणार असल्याचे दमानिया यांनी जाहीर केले आणि खोतकरांना धडकी भरली. अर्जुन खोतकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे अंजली दमानिया यांचा लढा कितपत यशस्वी होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
खरतरं अंजली दमानिया या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. धनंजय देशमुख यांच्यासह जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी रामनगर साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांची भेट घेतली. या संदर्भातील कागदपत्रे, पुरावे आणि प्रत्यक्ष फसवणूक झालेल्या सभासद शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खोतकरांच्या भ्रष्टाचाराची फाईल घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे दमानिया यांनी सांगितले.
कारखान्यातील कामगारांची तब्बल 108 कोटींची देणी असतांना खरेदी विक्रीचा व्यवहार झाला. कर्मचाऱ्यांचा पीएफ, थकीत पगार याकडेही कानाडोळा करण्यात आला. या कर्मचाऱ्यांसह सभासद शेतकरी यांना न्याय मिळाला पाहिजे, अशी भूमिका घेत अंजली दमानिया यांनी खोतकरांवर निशाणा साधला आहे. ईडीची कारवाई टळल्यानंतर आता याच प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची तयारीही दमानिया यांनी सुरू केली आहे. एप्रिल अखेरीस या विरोधात त्यांचा लढा सुरू होणार आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.