Antarwali Sarati Stone Pelting  Sarkarnama
मराठवाडा

Antarwali Sarati News : अंतरवाली सराटी दगडफेकीतील आरोपींना अटक; पिस्तूल जप्त...

Chetan Zadpe

Marathwada News : अंतरवली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge) येथील आरक्षणासाठी बसलेले आंदोलनकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाल्यानंतर लाठीचार्ज घडून आला. यादरम्यान दगडफेकीचीही घटना घडली. आता या दगडफेकीच्या आरोपामध्ये ऋषिकेश बेदरे या तरुणाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

अटक केलेल्या बेदरे याच्याकडे चक्क एक गावठी पिस्तूल, सोबतच दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. अंतरवाली सराटी येथील दगडफेकीचा आरोपी बेदरे याच्यावर कट रचून जिवे मारण्याच्या हेतूने दगडफेक केली, असा गुन्हा गोंदी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असताना बेदरे हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह आढळून आला आहे.

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पोलिस आणि आंदोलक यांच्यामध्ये झटापट झाली होती. पोलिस आणि आंदोलकात हा तणाव सुरू झाल्यानंतर दरम्यानच्या दगडफेकीच्या घटनेत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या बेदरेकडे जिवंत काडतूस अन् पिस्तूल आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मराठा आंदोलकांवर जो काही लाठीचार्ज झाला, त्याचा आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र, अशा प्रकारचा आदेश फडणवीसांनी दिला नसल्याची माहिती अधिकारातून आता स्पष्ट झाले आहे. जालन्यातील पोलिस उपअधीक्षक आर. सी. शेख यांनी याबाबत माहिती दिली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT