Beed News : मराठा आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यात बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या मोठ्या घटना घडल्या होत्या. तसेच थेट राजकीय नेत्यांनाही लक्ष्य केले होते. या घटनेनंतर जाळपोळीच्या घटना स्थळांची पाहणी केली.
मराठा आरक्षणाच्या लढ्यातील आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ राहिले होते. आता त्याच भुजबळांनी जरांगे पाटलांना टीकेची झोड उठवतानाच जालन्यातील सराटी अंतरवालीत लाठीचार्ज, बीडमधील जाळपोळीच्या घटनांवरून काही सवाल उपस्थित केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सोमवारी बीड जिल्ह्यातील मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. या वेळी त्यांनी जाळपोळीच्या घटनांवर थेट भाष्य केले. या वेळी ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. यात मंत्र्यांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत अनेकांचा यात समावेश आहे. मतांसाठी सर्व सुरू असेल, तर तुम्हाला ओबीसींची मतं नको का? असा सवालही भुजबळ यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भुजबळ म्हणाले, मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण केले, त्यावेळी जो लाठीचार्ज झाला, त्यात पोलिस जखमी झाले. पोलिसांची बाजू पुढे आले नाही. 70 पोलिस जखमी झाल्यावर काय करणार. त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून त्यांनी काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली. तसेच त्यांचं उपोषण सोडण्यासाठी एक न्यायमूर्ती जात असतील, तर आम्हाला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक, पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, असे भुजबळ म्हणाले.
मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही. मात्र, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी मागणी आहे. ओबीसीमध्ये अनेक छोट्या-छोट्या जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यास कोणालाही याचा फायदा होणार नाही. आमची जी भूमिका आहे तीच शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षांची आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सर्वांची असल्याचेही भुजबळ म्हणाले.
तेली आणि माळी समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत, त्यामुळे तुम्ही त्यांचे घरे आणि कार्यालये जाळली का? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी केला. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यास कोणालाही याचा फायदा होणार नाही. आमची जी भूमिका आहे, तीच शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह सर्वच पक्षांची आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सर्वांची असल्याचेही ते म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये. त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होईल. ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. आंदोलनावेळी ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्यात आलं. घरांवर हल्ले झाले. या वेळी पोलिस इतके हतबल कसे झाले. त्यांनी कुठेही प्रतिकार केला नाही. बीडमधील हिंसाचार पूर्वनियोजित कट होता. किती पोलिस जखमी झालेत याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली.
तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसांत कसे मिळाले. 13 हजार पुरावे मिळाले म्हणता?, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरू आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरू आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको याचा पुनरुच्चार भुजबळांनी केला.
तुम्ही मतांसाठी हे करत असाल तर ओबीसींची मतं तुम्हाला नको का?, मराठे म्हणतात, भुजबळांना मतदान देऊ नका, मग ओबीसींनीही तसा विचार केला तर?, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. यात अनेकांचा समावेश. मतांसाठी सर्व सुरू असेल, तर तुम्हाला ओबीसींची मतं नको का? असे भुजबळ म्हणाले.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.