Phulambri Constituency News Sarkarnama
मराठवाडा

Phulambri Assembly Constituency : महायुतीची गॅरंटी, `लाडकी बहीण योजना` अखंडित सुरुच राहणार!

Mahayuti's guarantee that the beloved sister scheme will continue indefinitely : बालकांसाठी सुरक्षाकवच म्हणून सीसीटिव्हीचा प्रयोग आपण मतदारसंघात राबवत आहोत. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठीच आपण लढतो आहे.

Jagdish Pansare

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यातील महायुती सरकारने विकासाच्या असंख्य कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. यातून सर्व स्तरातील नागरिकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कोट्यावधी माता-भगिनींना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी एक नवी संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे.

महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत माता-भगिनींना साडेसात हजार रुपये थेट बॅंक खात्यात दिले आहेत. (CM Ladki Bahin Yojana) ही योजना पुढेही अखंडित सुरूच राहणार, असल्याची ग्वाही, फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी दिली.

मतदारसंघातील गागावामध्ये चव्हाण प्रचारसभा, काॅर्नर बैठका घेऊन सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती, फुलंब्री मतदारसंघात झालेली विकास कामे मतदारांपर्यंत पोहचवत आहेत. (Mahayuti) महिला सुरक्षेवर आपण अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे चव्हाण सांगतात. विकासाचा हा ओघ राज्यात कायम राखण्यासाठी महायुती सरकारला भक्कम पाठिंबा देणे आवश्यक आहे.

बालकांसाठी सुरक्षाकवच म्हणून सीसीटिव्हीचा प्रयोग आपण मतदारसंघात राबवत आहोत. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठीच आपण लढतो आहे. या शिवाय शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. युवक, ज्येष्ठ, महिला, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक प्रत्येकासाठी विविध योजनांच्या माध्यमातून विकास साधण्याचा प्रयत्न सुरू, असल्याचे अनुराधा चव्हाण म्हणाल्या.

आदर्शगाव किनगाव हे अत्यंत जिद्दीने, कल्पकतेने व गावकऱ्यांच्या खंबीर साथीने आपण अल्पावधीतच नावारूपाला आणले. अशाच प्रकारे संपुर्ण मतदारसंघाचा विकास पुढील काळात करण्याचा आपला मानस असल्याचे अनुराधा चव्हाण यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT