Santosh Deshmukh Murder Case Sarkarnama
मराठवाडा

Santosh Deshmukh Murder Case : CM फडणवीसांनी आरोपींना शिक्षा करण्याची घोषणा करताच, संतोष देशमुखांच्या मुलीने केली 'ही' मोठी मागणी

Devendra Fadnavis On Santosh Deshmukh Murder Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल. तसंच या प्रकरणाचा तपास SIT आणि न्यायालयीन चौकशीद्वारे केला जाईल अशी घोषणा केली आहे.

Jagdish Patil

Santosh Deshmukh Murder Case : "माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आलं तशीच कठोर शिक्षा आरोपींना व्हावी"; अशी प्रतिक्रिया बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देखमुख हिने दिली आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांच्या निर्घृण हत्येमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे.

या हत्या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांनी हे प्रकरण ताणून धरल्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणी सभागृहात निवेदन दिलं. शिवाय सरपंच संतोष देशमुख यांची गुन्हेगारांना सोडणार नाही. जो कोणी या प्रकरणात दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं.

मात्र, फडणवीसांच्या या मागणीनंतर संतोष देशमुख यांच्या मुलीने आरोपींनी माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारलं तशीच शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. माध्यमांशी बोलताना देशमुख यांची मुलगी वैभवी म्हणाली, "आम्ही पोलिसांच्या तपासावर समाधानी नाही. एकूण 7 आरोपी असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, त्यातील चार आरोपींनाच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आणखी 3 आरोपींना तत्काळ अटक करावी आणि मुख्य सूत्रधाराला अटक करून माझ्या वडिलांना ज्या प्रकारे मारण्यात आलं, तसेच कठोर शिक्षा या आरोपींना व्हावी."

संतोष देशमुख हत्या प्रकरणावर फडणवीस काय म्हणाले?

शुक्रवारी सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमार्फत केला जाईल. तसंच या प्रकरणाचा तपास SIT आणि न्यायालयीन चौकशीद्वारे केला जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेवर देशमुख कुटुंबीयांनी समाधानी नसल्याचं सांगितलं आहे. कारण या प्रकरणातील इतर आरोपी अद्याप फरार असल्याचं देशमुख यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे.

वाल्मिक कराडला सोडणार नाही - फडणवीस

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या (Valmik Karad) नावाची मोठ्या प्रमामात चर्चा आहे. शिवाय तो धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) जवळचा असल्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर फडणवीसांनी काल स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, या प्रकरणाची आम्ही चौकशी करणार, वाल्मिक कराडबद्दलचे पुरावे असतील तर तो कोणत्या पक्षाचा आहे आणि त्याचे फोटो कोणासोबत आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT