Mahayuti News : मंत्रिमंडळाचे खाते वाटप का रखडले? गुलाबराव पाटलांनी नेमके 'हे' कारण सांगत केला मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Cabinet portfolio distribution News : हिवाळी अधिवेशन संपत आले तरी खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री वगळता सर्वच जण बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे.
 Minister Gulabrao Patil
Minister Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा शनिवारी शेवटचा दिवस आहे. राज्यातील महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तार होऊन सात दिवस झाले व दुसरीकडे हिवाळी अधिवेशन संपत आले तरी खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री वगळता सर्वच जण बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष खातेवाटपाकडे लागले आहे.

अधिवेशन सुरु होण्यापूर्वी महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला. मात्र त्यानंतर अद्याप मंत्र्यांना खात्याचं वाटप करण्यात आले नाही. खाते वाटप रखडल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे, त्यातच आता यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत गौप्यस्फोट केला आहे. (Mahayuti News)

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे, त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर खातेवाटप रखडले आहे.

 Minister Gulabrao Patil
Santosh Deshmukh Murder Case : धनंजय मुंडे यांना कोण वाचवत आहे?

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काम सुरू केले आहे. एक ते दोन दिवसांमध्ये खाते वाटप जाहीर होईल. खाते वाटप करण्यास उशीर झालेला नाही. तीन पक्षात काही खात्यावरून वाद आहेत. येत्या एक दोन दिवसात तिघे जण एकत्र बसून चर्चा करतील, त्यानंतर एक दोन दिवसांमध्ये खात्याचे वाटप होईल, असेही गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

 Minister Gulabrao Patil
Santosh Deshmukh Murder Case : कोणाला तरी वाचवण्याच्या नादात SIT, न्यायालयीन चौकशीचा घाट; जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात 'राजकारण' सांगितलं

पक्षाच्या वरिष्ठ नेत्याकडे पालकमंत्री असो किंवा कोणते खाते मी कुठल्याही गोष्टीसाठी डिमांड केलेली नाही. नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न मी करणार आहे. कॅबिनेट मंत्री होणे एवढं सोपे नाही, पाच वर्षांचा काळ काढल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद भेटले आहे. मला वाटते दुसऱ्यांदा कबॅनेट मंत्रिपद भेटणं ही जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे, असेही त्यांनी सांगितले.

 Minister Gulabrao Patil
BJP Politics : काँग्रेसच्या भाजपमुक्त कोल्हापूरच्या मनसुभ्याला सुरुंग, स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीतही बसणार धक्का?

बीडमध्ये सरपंचाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. यावर देखील गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये जी घटना घडली ती निश्चितपणे निषेधार्ह आहे. सभागृहामध्ये आमदार सुरेश धस यांनी यासंदर्भात निवृत्त न्यायाधीश किंवा सध्याचे न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण घटनेची चौकशीची मागणी केली आहे. चौकशीत जे निष्पन्न होईल त्यामध्ये दोषी कोणीही आढळला तर कोणालाही सोडले जाणार नाही, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

 Minister Gulabrao Patil
Solapur Politic's :मोहिते पाटलांच्या मदतीने आयुष्यात कुठलीही निवडणूक लढवणार नाही; राम सातपुतेंची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com