asaduddin owaisi Sarkarnama
मराठवाडा

lok Sabha Election : संभाजीनगरात ओवेसींच्या निशाण्यावर ठाकरे अन् खैरेच

Chhatrapati Sambhajinagar : ओवेसी यांनी वैजापूर, कन्नड तालुक्यात घेतलेल्या सभांमधून चंद्रकांत खैरे यांना टार्गेट करत आपली खरी फाइट शिवसेना ठाकरे गटाशीच असल्याचे स्पष्ट केले.

Jagdish Pansare

Lok Sabha Election : लोकसभेच्या मागील निवडणुकीत संभाजीनगरातून मिळालेली एकमेव जागा टिकवण्यासाठी 'एमआयएम'चे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी दोन दिवसांपासून संभाजीगनरात तळ ठोकून आहेत. शिवसेना ठाकरे गटाने महाविकास आघाडीकडून MVA चंद्रकांत खैरे यांना तर 'एमआयएम'ने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. महायुतीचा उमेदवार अजून घोषित व्हायचा आहे. त्याआधीच ओवेसी यांनी वैजापूर, कन्नड तालुक्यात घेतल्या सभांमधून चंद्रकांत खैरे Chandrakant Khaire यांना टार्गेट करत आपली खरी फाईट शिवसेना ठाकरे गटाशीच असल्याचे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे गेल्यावेळी ज्या वंचित आघाडीमुळे Vanchit Bahujan Aghadi 'एमआयएम'ला संभाजीनगरात यश मिळाले त्या वंचित आणि त्यांनी जाहीर केलेले उमेदवार अफसर खान यांची दखलही ओवेसी यांनी घेतली नाही. खान की बाण या मुद्द्यावर चार वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेल्या चंद्रकांत खैरे यांचा बाण कुठे गेला? असे म्हणत ओवेसी यांनी टोला लगावला.

तीस-चाळीस वर्षांत जे कधी रमजान ईदच्या शुभेच्छा द्यायला आले नाहीत, ते आता दिसू लागले आहेत, हा इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांना तुम्ही निवडून दिल्याचा परिणाम असल्याचे ओवेसी म्हणाले. इम्तियाज जलील यांच्या कामाचे कौतुक करताना ते मुसलमान असूनही त्यांनी मंदिराच्या कामासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत आम्ही दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवत नाही. इम्तियाज जलील यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, खेळाडू अशा सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्यांना 2019 मध्ये निवडून पाठवले आणि तुमची ताकद दाखवून दिली. त्याचाच परिणाम आहे की जे कधी ईदच्या शुभेच्छा द्यायला येत नव्हते ते आता दिसू लागले आहेत.

खैरे यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याच्या केलेल्या भावनिक आवाहनाची खिल्ली उडवताना तुमची शेवटची निवडणूक 2019 मध्ये झाली, असा चिमटा काढत इम्तियाज जलील यांच्या विजयाचा दावा केला. एकूणच ओवेसी यांच्या भाषणाचा रोख हा शिवसेना ShivsenaUBT ठाकरे गट आणि चंद्रकांत खैरे यांच्यावर दिसून आला. या निवडणुकीत खैरे यांच्याशीच इम्तियाज यांची लढत असणार आहे, हे ओवेसींच्या भाषणातून स्पष्ट झाले. महायुती, वंचितच्या उमेदवारांची दखल ओवेसींनी घेतली नाही. वंचितशी युती तुटली तरी एमआयएम संभाजीनगरात विजय मिळवू शकते, असा विश्वास ओवेसी व्यक्त करताना दिसत आहेत.

R

SCROLL FOR NEXT