MP Amol Kolhe News : चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवते का ? खासदार कोल्हे यांनी कोणावर साधला निशाणा !

Shirur Lok Sabha Constituency : नागपूरकर उपमुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही केली टीका..
amol kolhe
amol kolhesarkarnama
Published on
Updated on

Pune News :दहा महिन्यांनी पुन्हा एकदा पक्षफुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं. चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवतं का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का? असे थेट सवाल करत डॉ. कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला.

गेल्या काही दिवसांपासून कोल्हे अजित पवारांवर थेट हल्ला करताना दिसत आहेत. नटसम्राट म्हणून खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी टीका केल्यानंतर कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर प्रतिहल्ला करत पलटी सम्राट आणि खोके सम्राट असा उल्लेख केला.पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा कधीही नटसम्राट चांगलं असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेवर प्रतिहल्ला केला आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण होईपर्यंत उमेदवार तसेच राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोप असेच सुरू राहणार असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकादा समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

amol kolhe
Ajit Pawar News: नवी खेळी? बारामती लोकसभेसाठी आता अजित पवारदेखील उमेदवार...

आज मंगळवारी शिरूर (Shirur) तालुक्यातील आंबेगाव गावभेट दौऱ्या दरम्यान, गावातील नागरिकांशी संवाद साधताना. कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा कडक शब्दांत समाचार घेतला. माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा, नागपूरकर उपमुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला.

बारामतीकर (Baramati) उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले, आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्रीदेखील येतील. पण माझ्या सर्वसामान्य मतदाराला कळतंय. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही, तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, असेही डॉ. कोल्हे म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

R

amol kolhe
Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा जागावाटपाचा वाद भाजप आमदारांसाठी ठरणार नवी डोकेदुखी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com