Asaduddin Owaisi Nida Khan sarkarnama
मराठवाडा

Asaduddin Owaisi News : आरोप म्हणजे दोषी नाही, असदुद्दीन ओवेसींकडून निदा खानची पाठराखण! म्हणाले, 'एमआयएमची बदनामी...'

Asaduddin Owaisi Nida Khan : आरोपी म्हणजे दोषी नाही. मीडिया ट्रायल चुकीची आहे, असे सांगत टीसीएस धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानची पाठराखण असुद्दीने ओवैसी यांनी केली आहे.

Jagdish Pansare

Aimim News : एखाद्या व्यक्तीवर आरोप झाला म्हणजे त्याला दोषी ठरवून मीडिया ट्रायल घेणे चुकीचे आहे. मालेगावच्या बाँम्ब स्फोटात आरोप असलेली महिला खासदार होते, ज्यांना दोषी म्हणून वर्षानुवर्षे तुरुगांत टाकले ते निर्दोष ठरले, याकडे लक्ष वेधत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी माध्यमांना आणि विरोधकांना तुम्ही न्यायालय किंवा न्यायमुर्ती होऊ नका, असा टोला लगावला.

उच्चशिक्षित मुस्लिम तरूण-तरुणींना बदनाम करण्याचे हे षडयंत्र असल्याचा आरोप करत ओवेसी यांनी निदा खानची पाठराखण केली. नगरसेवक मतीन पटेल याचा या प्रकरणात काय रोल आहे? हे पोलीस चौकशीत समोर येईल, त्यासाठी आमच्या संपूर्ण पक्षाची बदनामी करू नका, असे आवाहनही ओवेसी यांनी केले. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाच्या बैठकीत त्यांनी निदा खान प्रकरणावरून एमआयएम, इम्तियाज जलील यांना टारगेट करणाऱ्यांना सुनावले.

नाशिकच्या टीसीएस कंपनी प्रकरणात मीडीया ट्रायल सुरू आहे. टीसीएसने स्पष्टीकरण दिले आहे नीदा खान ही एचआर मॅनेजर नव्हती तीने कंपनी सोडलेली आहे. तीच्यावर एफआयआरमध्ये भावना भडकावण्याचा आरोप करण्यात आला आहे, धर्मांतराचा नाही.

माध्यमांवर जे दाखवले जात आहे हे द्वेषाचे राजकारण आहे. तिच्याकडे सापडलेले बुरखा, मुस्लिम धार्मिक ग्रंथ मिळणे गुन्हा आहे का? उच्चशिक्षित मुला- मुलींना टार्गेट करुन भविष्य उध्वस्त करण्याचा षडयंत्र रचले जात आहे.

मालेगाव, मुंबईत रेल्वेत जे ब्लास्ट झाले त्यामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले त्यामध्ये हिंदू, मुस्लिम मारले गेले. त्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत न्याय मिळाला का? त्यांच्या कुटुंबियांना माध्यमांनी विचारले का? मालेगाव केसमधील आरोपी असलेल्या खासदार बनून लोकसभेत पोहोचले. दिल्लीमध्ये आतंकवादी म्हणून तुरुंगात टाकलेल्या तरुणांना काही वर्षांनंतर न्यायालयाने सोडले, अशी अनेक उदाहरणे आहेत.

आरोप म्हणजे दोषी ठरत नाही, नीदा खानला अटक झाली आहे, पोलिस चौकशी करत आहेत. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, नीदा खानची निर्दोष मुक्तता होईल. एमआयएमवर जे आरोप केले जात आहे मी त्याचे खंडन करतो. नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नीदा खानला लपवल्याचा आरोप करण्यात आला तो चौकशीला सामोरे जाईल. राज्यातील अनेक आमदार खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.

न्यायालयाचे निर्णय येवू द्या पक्षाला विरोधक बदनाम करत आहेत, त्यांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी तयार आहे, असे ओवेसी यांनी सांगीतले. वंदे मातरम् बोलने देशातील नागरिकांना अनिवार्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला याकडे ओवेसींचे लक्ष वेधले. यावर रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. टागोर हे एक महान व्यक्ती होते, सध्याचे निर्णय घेणारे सत्ताधारी त्यांच्यापेक्षा महान होऊ शकतात, असा टोलाही ओवेसी यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT