Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : 'संजय शिरसाटांना मी कवडीचीही किंमत देत नाही!': निदा खान प्रकरणात पोलीसांना सहकार्य करेल! इम्तियाज जलील यांची भूमिका

Imtiaz Jaleel on Nida Khan case : निदा खान प्रकरणावरून एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाटांवर जोरदार टीका केली. पोलिस तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel NewsSarkarnama
Published on
Updated on

Nida Khan Arrest News : नाशिकच्या टिसीएस कंपनीतील लैगिंक अत्याचार आणि जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात संशयित निदा खान हिला काल नाशिक-छत्रपती संभाजीनगर पोलीसांनी संयुक्त कारवाईत अटक केली. छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागातील कैसर कॉलनीतील एका घरातून तिला रात्री उशीरा अटक करण्यात आली.

यावरून शिवसेनेचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचे थेट नाव घेत त्यांच्या चौकशी मागणी केली. यावर संजय शिरसाट यांना आपण कवडीची किमंत देत नाही, पोलीसांनी मला विचारले तर त्यांना सहकार्य करेल, अशी भूमिका घेतली आहे. संजय शिरसाट यांनी आरोप केले म्हणजे आपण गुन्हेगार ठरत नाही, मुळात त्यांना आपण किंमतच देत नाही, पोलीसांनी निदा खान विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानूसार पोलीस कारवाई करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Tamil Nadu Hung Assembly : तामिळनाडूत सत्ता सस्पेन्स; बहुमत नाही, तर राज्यपालांचा ‘हा’ अधिकार काय सांगतो?

गेल्या 27 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मतीन खान नावाच्या एमआयएमच्या नगरसेवकाने तिला मदत केल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक पोलीसांकडून त्यांची चौकशीही केली जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना निदा खान प्रकरणात एमआयएम आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.

या आरोपांना इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आपण पालकमंत्र्याना काडीमात्र भाव देत नाही, त्यांनी आरोप केले म्हणून आपण गुन्हेगार ठरत नाही. निदा खान निर्दोष असेल तर तिच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू असेही इम्तियाज यांनी सांगीतले. या प्रकरणात पोलीसांनी एफआयआर दाखल केला म्हणजे त्यात काही तरी तथ्य असेल. पोलीस नियमाप्रमाणे कारवाई करतील.

याबबात मला पोलिसांना विचारणा केली तर मी निश्चितच त्यांना सहकार्य करेल. पालकमंत्र्यांच्या माझ्यावरील आरोपांना व त्यांना मी काडीमात्र भाव देत नाही, मला पोलीस आयुक्त किंवा नाशिक पोलीस जे प्रश्न विचारतील त्यांना मी सहकार्य करेल, याचा पुनरुच्चारही इम्तियाज यांनी केला. निदा खान विरोधात दाखल झालेली एफआयआर जर तुम्ही वाचली, त्यात निदाचा रोल काय आहे? हे बघितलं तर तुम्हालाही कळेल, यात काहीही नाही.

जेव्हा निदा खानने मला हे प्रकरण आणि तिच्यावरील आरोपांबद्दल सांगीतले तेव्हा, आपण तू काही चुकीचे केले नसेल तर मी तुझ्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहीन, पण तुझी चूक आढळली तर अजिबात मदत करणार नाही, हे मी उघडपणे सांगतो. शेवटी न्यायप्रणाली आपला न्याय देईल, आम्हाला विश्वास आहे की तिला न्याय मिळेल, असा विश्वासही इम्तियाज यांनी व्यक्त केला.

Sanjay Shirsat-Imtiaz Jaleel News
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! 8 दिवसात सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत; एकाचवेळी जमा होणार 4500 रुपये?

दोषी असेल तर मला फाशी द्या..

या प्रकरणात मी कुठेही दोषी असेल तर मला खुशाल फासावर लटकवा, असे आव्हान, इम्तियाज जलील यांनी आरोप करणार्‍यांना दिले. निदा खान हिच्यावर धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचे कलम लावण्यात आले आहे. तिच्यावर गुन्हा सिध्द झालेला नाही, त्यामुळे तिला जामीन मागण्याचा अधिकार आहे. पण आता केवळ आरोप झाला तरी त्याला दोषी समजून फासावर लटकवण्याची मागणी केली जाते.

हत्या, दरोडा, देशविरोधी कारवाई असा आरोप जर एखाद्यावर असेल तर तो गंभीर गुन्हा आहे. पण अशा प्रकारचा कुठलाही आरोप निदा खान हिच्यावर नाही. पोलीसांनी जबरदस्तीने धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा तिच्यावर दाखल केला आहे. आम्ही त्याचेही समर्थन करत नाही. मी पोलीसांकडून या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहे.

आमच्या नगरसेवकाचा यात काय रोल आहे, याबाबतही आपण विचारणार आहोत, असेही इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी बोलताना सांगीतले. दरम्यान, पोलीसांचे एक पथक इम्तियाज जलील यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झाले आहे. मात्र आपण वैयक्तिक कामसाठी आलो आहोत, असे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी माध्यमांना सांगीतले. निदा खान प्रकरणात नारेगाव प्रभागातील नगरसेवक मतीन पटेल यांचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. निदा खानला नगरसेवक मतीन पटेलने आश्रय दिल्याचा आरोप असून या प्रकरणी पोलीसांनी कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com