Matin Patel : मोठी बातमी! निदा खानला आश्रय देणं भोवलं; MIM नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर, कार्यालयावर चालवणार बुलडोझर

नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हीला आश्रय दिल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर आता बुलडोझर चालवला जाणार आहे.
Nida Khan_Matin Patel
Nida Khan_Matin Patel
Published on
Updated on

Matin Patel Bulldozer action : नाशिकच्या टीसीएस धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हीला आश्रय दिल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतिन पटेल यांच्या घरावर आणि कार्यालयावर आता बुलडोझर चालवला जाणार आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं त्यांच्या या दोन्ही ठिकाणांसाठी अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळं या इमारतींवर आता बुलडोझर चालवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

Nida Khan_Matin Patel
सुवेंदू अधिकारींच्या ४ खास सहकाऱ्यांचे झाले खून! काय आहे राजकारण?

नेमकं प्रकरण काय?

नाशिक पोलीस शोध घेत असतानाही निदा खान हिला मतिन पटेल यांनी आपल्या निवासस्थानी लपवून ठेवलं असल्या प्रकरणी पटेल यांच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर निदा खानसोबत त्यांना सहआरोपी देखील करण्यात आलं आहे. याच्या पुढची कारवाई म्हणून मतीन पटेल यांच्या नारेगाव येथील कार्यालय आणि ज्या घरात निदा खान हिला आश्रय दिला होता ते घर आणि तिसरी जागा म्हणजे त्यांचं राहत घरं या तिन्ही ठिकाणी छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून नोटीस चिकटवण्यात आली आहे.

Nida Khan_Matin Patel
Mamata Banerjee: ममता बॅनर्जी माजी मुख्यमंत्री नाहीत तर....! सोशल मीडिया बायोमुळं भलतीच चर्चा सुरु
Matin Patel Notice
Matin Patel Notice
Matin Patel Notice
Matin Patel Notice

नोटीशीत काय म्हटलं?

नोटीशीत म्हटलं की, तुम्ही नारेगाव इथल्या जागेत अतिरिक्त बांधकाम केलं असून त्याचा व्यावसायिक आणि रहिवासी अशा दोन्ही प्रकारे वापर करत आहात. हे संपूर्ण बांधकाम विनापरवाना करण्यात आलं आहे. त्यामुळं हे अनधिकृत बांधकाम असल्याची अतिक्रमण विभागाची धारणा आहे. त्यामुळं अशी इमारत किंवा बांधकाम का काढून टाकण्यात येऊ नये? त्याचा फेरफार का करण्यात येऊ नये किंवा ते पाडून टाकण्यात का येऊ नये? याबाबतचं आपलं म्हणणं ही नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत कार्यालयात सादर करावं. तुमचं उत्तर आल्यास त्याचं अवलोकन करुन ते मान्य किंवा नाही हे तुम्हाला कळवण्यात येईल. पण लेखी जबाब प्राप्त न झाल्यास हे प्रकरण एकतर्फी निकालात काढण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com