Asuddin Owaisi Rally In Parbhani News Sarkarnama
मराठवाडा

Asaduddin Owasi News : मराठी भाषेसाठी एकजूट दाखवून सरकारला झुकवले; तुमचे अभिनंदन! ओवेसींकडून कौतुक..

Asaduddin Owaisi publicly appreciated the unity demonstrated in support of the Marathi language, extending congratulations for the collective effort. : मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून छोटा भाऊ म्हणून इम्तियाज जलील उभे असतील.

Jagdish Pansare

AIMIM News : महाराष्ट्रात मराठी भाषाच चालेल, हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, असे म्हणत एकजूट दाखवल्याबद्दल तुमचे अभिनंदन. हिंदी भाषा लादू पाहणाऱ्या फडणवीस सरकारला जीआर मागे घ्यावा लागला, ही एकतेची ताकद आहे. महाराष्ट्रातील मराठी बांधवांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मराठी जनतेचे कौतुक केले. देशात एक भाषा, एक विचारधारा ही संघाची विचारसरणी आहे. पण विविधतेने नटलेल्या आपल्या भारतामध्ये ती चालू शकत नाही, असेही ओवेसी म्हणाले.

हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईत मोर्चाची घोषणा केली होती. सर्व राजकीय पक्षांना मराठी या एकाच अजेंड्यावर एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. याचा धसका घेत अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषे संदर्भातील दोनही जीआर मागे घेतले. मराठी जनतेच्या एकजुटीचा हा विजय असल्याच्या प्रतिक्रिया सर्वच स्तरातून येत आहेत. याचा पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owasi) यांनी मराठी जनतेचे अभिनंदन करत त्यांनी दाखवलेल्या एकजुटीचे जाहीर कौतुक केले.

परभणी येथील जाहीर सभेत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एमआयएम (Aimim) असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून छोटा भाऊ म्हणून इम्तियाज जलील उभे असतील, असा शब्दही ओवेसी यांनी आपल्या भाषणातून दिला. मुस्लिमांना न्यायालयाच्या आदेशाने शिक्षणात आरक्षण देण्यात आले आहे. सरकारला फक्त एक जीआर काढून त्याची अंमलबजावणी करायची आहे. पण सरकार ते ही करत नाही, यातून त्यांच्या मुस्लिम द्वेष दिसून येते, असेही ओवेसी म्हणाले.

भारताने स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या बांगलादेशमध्ये आज पाकिस्तानसोबत युद्धाभ्यास होत आहे. चीन तिथे एअर बेस उभारतोय हे सत्ताधाऱ्यांना दिसत नाही का? असा सवाल करत पाकिस्तान, बांगलादेश, चीन यांची वाढती जवळकीता आणि त्याचे धोके वेळीच ओळखा, असे आवाहन मोदी सरकारला केले. भाजप नेते देशात बांगलादेशी शोधण्याचे काम करत असताना, प्रत्यक्षात बांगलादेशमध्ये काय चालले आहे याकडे दुर्लक्ष करत आहेत.

देशात जर बांगलादेशी आढळत असतील, तर गुप्तचर यंत्रणा काय करत आहेत? देशाच्या सीमेपलीकडे काय चालले हे बघा, देशात मुसलमानांना संशयाच्या नजरेने पाहू नका. आरएसएस आणि भाजपला एकच भाषा, एकच आयडियॉलॉजी पाहिजे, पण भारत हजारो भाषा, विविध संस्कृतींचा देश आहे. एकच रंग लावायचा प्रयत्न झाला, तर भारत डिक्टेटरशिपमध्ये जाईल आणि आम्ही ते होऊ देणार नाही, असेही ओवेसी यांनी ठणकावून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT