Ashok Chavan, Devendra Fadnavis sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan : अशोक चव्हाण म्हणतात, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, हीच अपेक्षा होती!

Ashok Chavan Statement on Devendra Fadnavis as CM : मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष ते महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील. ते लोकप्रिय आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सक्षम सरकार आणि कार्यक्षम प्रशासन मिळेल.

Jagdish Pansare

छत्रपती संभाजीनगर : राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेंस अखेर काल संपला. खरतंर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट होते, मात्र पक्षाने विधिमंडळ गटनेता निवडीसाठी गुजरातचे मुख्यंत्री विजय रुपाणी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना मुंबईत निरीक्षक म्हणून पाठवले आणि वेगळ्या चर्चांना उधाण आले. मराठा, ओबीसी किंवा महिला मुख्यमंत्री होणार, भाजप धक्का देणार? अशा अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.

काल मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावावर विधीमंडळ गट नेता निवडीच्या बैठकीत एकमत झाले आणि या चर्चेला पुर्णविराम मिळाला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत ही, अपेक्षा होती असे म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. (Ashok Chavan) जनमताचा कौल देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर दिसून आला. त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच अपेक्षा होती. भाजप विधीमंडळ पक्षाने सर्वानुमते त्यांची विधीमंडळ पक्षनेते म्हणून निवड केली याचा आनंद व समाधान आहे.

मुख्यमंत्री म्हणून पुढील पाच वर्ष ते महाराष्ट्राला स्थिर सरकार देतील. ते लोकप्रिय आहेत, अनुभवी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला सक्षम सरकार आणि कार्यक्षम प्रशासन मिळेल, अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये आणण्यात फडणवीस यांची महत्वाची भूमिका होती.

पक्षात प्रवेश होताच राज्यसभेवर संधी आणि विधानसभा निवडणुकीत श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देत फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांना पक्षात झुकते माप दिल्याचे पहायला मिळाले. आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्या लेकीला पदार्पणात मंत्रीपद मिळते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT