Mahayuti News : गृहखात्यावरून शिंदे नाराज असतानाच शिवसेनेतील 'या' वादग्रस्त नेत्यांना मंत्रीपद देण्यास भाजपचा विरोध?

Maharashtra Politics BJP-Shiv Sena Tension on Cabinet Posts : एकनाथ शिंदेंना गृहमंत्रिपद देण्यास विरोध करणाऱ्या भाजपने शिंदे गटातील इतर नेत्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतल्याची माहिती आहे. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पाठवलेल्या यादीतील 7 मंत्र्यांपैकी काही नावांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
Eknath shinde, devendra fadnavis
Eknath shinde, devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 05 Dec : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरूवारी) सांयकाळी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. यासाठी महायुतीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मात्र या शपथविधीच्या सोहळ्यात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर ठाम असल्यामुळे खातेवाटपाबाबतचा तोडगा अद्याप निघाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या शपथविधी सोहळ्यात फक्त देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? की एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

तर दुसरीकडे शिंदेंना गृहमंत्रिपद देण्यास विरोध करणाऱ्या भाजपने (BJP) शिंदे गटातील इतर नेत्यांच्या मंत्रिपदावर आक्षेप घेतल्याची माहिती आहे. साम टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी पाठवलेल्या यादीतील 7 मंत्र्यांपैकी काही नावांवर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला आहे. वादग्रस्त कारकीर्द असलेले नेते मंत्रिमंडळात नकोत, अशी भूमिका भाजपकडून घेण्यात आल्याची माहिती आहे.

त्यामुळे आधीच गृहमंत्रिपदावरून नाराज असलेल्या शिंदेंच्या सेनेची आणखी नाराजी वाढली आहे. तर भाजपकडून आक्षेप घेण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये, संजय राठोड (Sanjay Rathod), अब्दूल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांच्या नावांचा सामवेश असल्याची माहिती आहे.

Eknath shinde, devendra fadnavis
Maharashtra CM Oath Ceremony Live Updates : देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला!

त्यामुळे आता शिंदे गटातील माजी मंत्र्यांच्या पुन्हा मंत्रिपदी वर्णी लागणार की नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मागील अनुभव पाहता आणि विरोधकांना टीका करण्याची संधी मिळू नये यासाठी मंत्रिमंडळात स्वच्छ चेहऱ्यांना संधी देण्याची रणनीती भाजपने आखल्याची माहिती आहे.

Eknath shinde, devendra fadnavis
TOP Ten News - ‘मी पुन्हा येईल' ऐवजी आता ‘तो पुन्हा आलाय...' ; महायुतीने केला सत्तास्थापनेचा दावा - वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

त्यामुळे शिंदेंसह अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील कोंडी झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ या नेत्यांवर भाजपनेच भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे आता भाजप या नेत्यांना पुन्हा संधी देणार की यांचा मंत्रिपदाच्या शर्यतीतून पत्ता कट करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com