Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर सुरू झाला आहे. सरकारने केलेली चांगल्या आणि उत्तम कामा आधारे जनतेसमोर जात आहोत. आत्मविश्वासाने आम्ही जनतेत जाऊन निवडणूक लढवीत आहोत, काँग्रेसने आत्मविश्वास गमावलेला असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रसने जाहिरात केली आहे, ती हास्यास्पद असल्याची टीका भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली. फेक नरेटीव्ह मुळे एकदा महाविकास आघाडीची लाॅटरी लागली. लाॅटरी एकदाच लागत असते, असा टोला चव्हाण यांनी यावेळी लगावला.
छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या जाहिरातीवर टीका केली. या जाहिराती हास्यास्पद असून त्यात प्रकाशक नाही. त्या जाहिरात मध्ये राष्ट्रीय नेत्यांचे फोटो आहेत, इथले कुणीही नाही. तेलंगणचे फोटो त्यात छापले आहेत. प्रकाशकाचे नाव टाकने बंधनकारक आहे. याकडे निवडणूक आयोगाने गांभीर्याने पहावे आणि तात्काळ दखल घ्यावी, या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.
इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांचे नाव, फोटो टाकणे, मुद्रक, प्रकाशकाचे नाव न टाकणे हे पराजयाचे लक्षण असल्याचा टोला त्यांनी लगावला. तेलंगणा सरकार सत्तेत आल्यावर दिलेले आश्वासन पूर्ण करता आले नाही. त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो महाराष्ट्रातील जाहिरातीत दिले जात आहेत, याकडे लक्ष वेधतानाच लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुक आचार सहिंतेमुळे अडचण निर्माण होऊ नये म्हणून दोन हफ्ते अगाऊ महिलांच्या खात्यात जमा केले असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
दुसरीकडे तेलंगणा सरकार आश्वासन पूर्ण करण्यात असमर्थ आहे. आणि त्याच्या मुख्यमंत्र्यांचे फोटो महाराष्ट्र निवडणुकीतल्या जाहिरातीत वापरले जात आहे. महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. दिलेला शब्द पाळणारे महायुतीचे सरकार आहे. लाडकी बहिण योजना सुरू झाल्यावर खिल्ली उडविण्याचे काम सुरू होते. ती योजना बंद करण्याचा देखील प्रयत्न झाला.
प्रचंड प्रतिसाद मिळत असताना विरोधक ही योजना आता चांगली असल्याचे बोलत आहेत. मागच्या निवडणुकीत फेक नरेटीव्ह सेट करण्यात आला होता. एकदा लॉटरी लागली म्हणजे प्रत्येकवेळी लॉटरी लागणार नाही, असा टोला चव्हाण यांनी महाविकास आघाडीला लगावला. सध्याही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, खोट्या नरेटीव्ह ला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. मी अजून सेक्युलर आहे, हिंदू असणे म्हणजे सेक्युलर नाही का? असा प्रश्न चव्हाण यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना केला.
मागच्या पक्षाशी आता माझा कुठलाही संबंध नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नक्षलवादाच्या प्रश्नाला उत्तर देतांना नांदेड जिल्हा बॉर्डरवर आहे. आम्ही नक्षलवाद सहन केलेला आहे. फडणवीस यांना तसे काही इनपुट असू शकतात. मी सरकारचा भाग नाही. आम्ही रणभूमीवर आहोत, समोरून हल्ला झालं तर आम्हाला प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आमच्या सरकार ने दहा टक्के आरक्षण दिले.
10 टक्के ईसीबीसी चा उल्लेख होता त्याचा नोकरीत फायदा झाला. ज्यांच्याकडे कुणबींची नोंद आहे त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आले आहे. किरकोळ स्वरूपातील आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यात आले असल्याचे चव्हाण म्हणाले. घर,वाहने जाळणे, मारहाण अशी गुन्हे कोर्टात आहेत. मी मराठा समाजाला आरक्षणाच्या समर्थनार्थ बोललो आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. मी राज्यसभेत आहे, मुलगी विधानसभा लढत आहे. मी लोकसभा लढविणे योग्य नाही, असेही चव्हाण यांनी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.