Ashok Chavan : अपक्षांचा 'आकडा' भाजप नेते माजी 'CM' चव्हाणांची वाढवतोय डोकेदुखी

Bhokar Assembly Constituency: नांदेड जिल्ह्यातील भोकर या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 167 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांची ही विधानसभा निवडणूक चांगलीच डोकेदुखी ठरू लागलीय. त्यांची कन्या श्रीजया या भोकर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अपक्षांची संख्या देखील वाढली आहे.

यामुळे अपक्षांचा भाव निघाला असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी 'आकडा' देखील दिवसागणित वाढू लागला आहे.

नांदेड जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आता निवडणुकीतून (Election) माघार घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर असून, या दिवसाकडे लक्ष लागलं आहे. या दिवशी नेमक्या काय उलथापालथी होतात, कोण कोणाला कोणता शब्द मिळतो, याची चर्चा आहे.

Ashok Chavan
Sikkim Assembly Election : देशात आहे, एकही विरोधी आमदार नसलेली विधानसभा; या राज्यात तीनदा असं घडलं!

नांदेड जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. यात भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 167 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी माजी मुख्यमंत्री भाजप (BJP) नेते खासदार अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अपक्ष उमेदवार चांगलाच भाव खात आहेत.

Ashok Chavan
Voters of Maharashtra Assembly 2024 : 50 लाख नवे मतदार

अपक्षांच्या मनधरणीसाठी बैठका

यामुळे अपक्षांना गळाला लावण्यासाठी नेत्यांनी आपल्या कार्यकर्ते अ‍ॅटिव्ह केलेत. अंधारात बैठका सुरू आहे. जातनिहाय, पक्षनिहाय अपक्षांचा भाव निघाला असून, तशा चर्चा झडत आहेत. अपक्षांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा 'आकडा' दिवसागणित वाढत आहेत. यातून नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.

माघारीसाठी 'फिल्डिंग'

नांदेडमधील लोहा अन् नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाली. या ठिकाणी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांना आपापल्या उमेदवारासाठी सभा, बैठका घेण्याचा आग्रह धरताना दिसत आहेत. तसंच आघाडी आणि महायुतीतील घटक पक्षातील इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत स्वकियांनाच आव्हान दिले आहे. यामुळे उमेदवारी कशा पद्धतीने मागे घेता येईल, यासाठीचे गणित बांधले जात असून, तशी 'फिल्डिंग' लावली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com