Amit Shah - Ashok Chavan News Nanded Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : महाराष्ट्र भाजपमय झालायं, आता नांदेडमध्ये शतप्रतिशतचा प्रयत्न करू! अशोक चव्हाण यांचा शहा-फडणवीसांना शब्द

In a significant political statement, Ashok Chavan has assured Amit Shah and Devendra Fadnavis of a 100% BJP win in Nanded : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या जोरावर आपल्या भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश होण्याचा मान पटकावला आहे.

Jagdish Pansare

Nanded BJP News : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. संपूर्ण राज्य भाजपमय झाले आहे. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा नांदेडमध्ये आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असेल, शतप्रतिशत भाजपासाठी आम्ही प्रयत्न करू, असा शब्द खासदार अशोक चव्हाण यांनी दिला.

ही मागणी करतानाच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा हा नांदेडमध्ये सर्वात मोठा पक्ष असेल, असा विश्वास दिला. शतप्रतिशत भाजपासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी ग्वाही अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी यावेळी दिली. मराठवाड्याच्या गरजा खूप कमी आहे, या भागात अधिक गुंतवणूक यावी, लोकांच्या हाताला काम मिळावं याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा. नांदेड-बीदर, नांदेड-लातूर या मार्गासह बुलेट ट्रेन आली तर आनंदच होईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या उपस्थितीत नांदेडमध्ये आज शंखनाद सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठवाड्याच्या विकासाला वेग देण्याची मागणी केली.

द्रुतगती मार्गाला गती मिळाली तर मराठवाड्याला भरपूर काही मिळाल्यासारखं होईल. अविकसित भागाला न्याय देण्याचं काम आपलं सरकार निश्चित करेल. राज्य देवाभाऊंच्या नेतृत्वात वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या जोरावर आपल्या भारताने जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकत जगातील चौथ्या क्रमांकाचा देश होण्याचा मान पटकावला आहे.

लवकरच आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरेल, अशा विश्वासही अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरेल, याबद्दल आपण काळजी करू नका. राज्य भाजपमय झाले आहे, आता नांदेडात शतप्रतिशत भाजपा आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, याचा पुनरुच्चार अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT