Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Ashok Chavan News : निवडणुकीमध्ये हार-जीत होते, आम्ही कमी पडलो; अशोक चव्हाणांनी सांगितले पराभवाचे कारण

BJP Political News : या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला असला तरी निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते, आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे या निवडणुकीत अपयश आले असल्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मान्य केले.

Sachin Waghmare

Nanded Political News : नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या समोरील आव्हान वाढले आहे.

या निवडणुकीत भाजपला पराभव स्वीकारावा लागला असला तरी निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते, आम्ही कुठेतरी कमी पडलो. त्यामुळे या निवडणुकीत अपयश आले असल्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी मान्य केले.

यावेळी त्यांनी नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली. या बाबत मी कुठली जाहीरपणे बोलणे योग्य नाही. निवडणुका मी सगळ्या सांभाळल्या आहेत. निवडणुकीमध्ये हार-जीत होत असते. ज्या आत्मविश्वासाने आम्ही ही इलेक्शन लढत होतो, त्यामध्ये आम्ही कमी पडलो, असे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट सांगितले.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने चूक झाली, असे मला कधीही वाटले नाही. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व पाहून त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे, अशा विचारातून हा निर्णय घेतला. एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून आपलं सारखं मत बदलणं योग्य नाही, अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी यावेळी मांडली.

भोकर विधानसभा मतदारसंघात कधी तिथे 5 हजारांची लीड असते तर कधी ते 98 हजारांची लीड असते. काय चांगला आहे, काय अडचणीचा आहे हे समजणारा मतदार त्याठिकाणी आहे. मागच्या 2019 चे उदाहरण पाहिले तर विधानसभा, लोकसभा निवडणुकीमध्ये फार फरक पडला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

भाजप (Bjp) कार्यकारिणीच्या मुंबईमध्ये झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत प्रत्येक मतदारसंघात कुठल्या कारणाने पराभव झाला ? याचा शोध घेण्याचे ठरले. त्यानुसार महाराष्ट्राच्या जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये पक्षाच्यावतीने काही ज्येष्ठ नेते यांना नियुक्त करण्यात आले आहेत.

ते प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्याठिकाणाचा अहवाल देणार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रत्येक मतदारसंघातील पराभवाचे कारण पुढे येईल, असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले

SCROLL FOR NEXT