Eknath Shinde News : ईव्हीएमबाबत मुख्यमंत्र्यांनी वायकरांची बाजू घेत विरोधकांवर सोडला 'बाण'

Shivsena Political News : सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या वादाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांकडून केले जात असलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama

Mumbai News : मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर अवघ्या 48 मतांनी विजयी झाल्यानंतर सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. आता या प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली.

या सर्व घडलेल्या प्रकरणानंतर सत्ताधारी व विरोधकाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या वादाबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) विरोधकांकडून केले जात असलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

या प्रकरणात विरोधकांकडून केले जात असलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) अवघ्या 48 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना नागरिकांनी भरभरून मतदान केले आहे. त्याचा फायदा त्यांना झाला आहे. विरोधक केवळ काहीच मुद्दा त्यांच्याकडे नसल्याने इव्हीएम विरोधात अपप्रचार करीत असल्याचा दावा यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी केला.

मुंबईतील मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर ते पत्रकरांशी बोलत होते. यावेळी शिंदे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या वेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्यांनी शिवसैनिकांना (Shivsena) विविध सूचना दिल्या आहेत. आषाढी वारीला जात असलेल्या वारकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना त्यांनी शिवसैनिकाला केल्या आहेत.

CM Eknath Shinde
Video Vijay vadettivar News : नाराज असलेल्या भुजबळांना भाजपसोबत जायचे नव्हते; वडेट्टीवारांनी केला गौप्यस्फोट

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

दरम्यान, या प्रकरणात वनराई पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. वायकरांच्या मेव्हण्याकडेच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल सापडल्यानंतर पोलिस आता मोबाईल हाती कसा सापडला आणि ओटीपी जनरेट कसा करण्यात आला या संदर्भाने माहिती घेत आहेत. मात्र, आता या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मात्र निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

CM Eknath Shinde
Thackeray Shivsena : ठाकरेंची शिवसेना लागली विधानसभेच्या कामाला; पूर्व विदर्भातील 14 जागांवर दावा, सक्षम उमेदवारांची चाचपणी

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com