Raosaheb Danve and Ashok Chavan Sarkarnama
मराठवाडा

Raosaheb Danve and Ashok Chavan : रावसाहेब दानवेंच्या दिल्लीतील बंगल्यात अशोक चव्हाणांचे 'Grand Welcome'

Ashok Chavan at Raosaheb Danve Bungalow : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच दिल्लीतील भाजपच्या चाणक्यांनी अशोक चव्हाणांचा प्रवेश करून घेत काँग्रेसला मोठा दणका दिला आहे.

Jagdish Pansare

BJP welcomes Ashok Chavan in Delhi : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठे भूकंपाचे दावे करत अनेक बड्या नेत्यांना गळाला लावल्यानंतर दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये प्रवेश देत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच दिल्लीतील भाजपाच्या चाणक्यांनी मोठा डाव जिंकला. त्यानंतर दिल्लीत भाजपाच्या तंबूत अशोक चव्हाणांचे स्वागत कसे होते? याकडे सगळ्यांचे लक्ष होते.

पण त्याआधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील बंगल्यात मात्र अशोक चव्हाण यांचे ग्रॅन्ड वेलकम करण्यात आले. स्वतः रावसाहेब दानवे यांनी अशोक चव्हाण यांचा हात हातात घेऊन त्यांना बंगल्यात आणले. निमित्त होते भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांच्या स्नेह-भोजन कार्यक्रमचे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक दिवसांनी सर्वजण एकत्र आले होते.

या सर्वांसाठी दानवे यांनी आपल्या बंगल्यावर स्नेहभोजन ठेवले होते. भाजपाच्या बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचा वाढदिवस, त्याला पंकजा मुंडे-फडणवीस यांनी लावलेली हजेरी याचीही दिल्लीत आणि राज्याच्या राजकारणात चर्चा होत आहे. या सगळ्यामध्ये लक्ष वेधले ते माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेल्या अशोक चव्हाण यांनी. भाजपचे सदस्य म्हणून त्यांनी राष्ट्रीय अधिवेशनाला हजेरी लावली.

भाजपाच्या दिल्ली आणि राज्यातील नेत्यांनी त्यांना सन्मानाची वागणूक दिली. महाराष्ट्रातील भाजपाचे नेते त्यांची दिल्लीत काळजी घेतांना दिसले. विशेष म्हणजे रावसाहेब दानवे यांनी त्यांना काय हवे, नको हे स्वतः पाहिले. बराचवेळ हे दोन नेते एकमेकांचा हातात हात घेऊन गप्पांमध्ये रंगले होते. काही दिवसांपुर्वी एकमेकांवर टीका करणाऱ्या या दोन नेत्यांमधील बाॅन्डिंग पाहता हे कधी विरोधक होते, असे कोणी म्हणूनच नये इतके दानवे-चव्हाण सोबत दिसत होते.

राजकीय व सामाजिक कार्यामध्ये आम्ही सर्वजण आपापल्या क्षेत्रात पूर्ण वेळ जनसेवे मध्ये व्यस्त असतो, त्यामुळे सर्वांना एकत्रित भेटून आनंद झाला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, गप्पा झाल्या. राजकीय व वैयक्तिक जीवनात आलेल्या अनेक अनुभवांवर अगदी मनमोकळी चर्चा झाल्याचे दानवे यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT