Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप आणि AIMIM मध्ये जोरदार शाब्दिक युद्ध भडकले आहे. छत्रपती संभाजीनगर नामांतरावरून असदुद्दीन ओवैसींनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
"फडणवीस यांचे शिंदे यांच्याबरोबर पटत नाही. त्यामुळे फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न भंगणार आहे", असा टोला असदुद्दीन ओवैसी यांनी लगावला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM असदुद्दीन ओवैसी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "फडणवीसजी तुम्ही मुख्यमंत्री होणार नाहीत. तुमचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगणार आहे. तुमच्यात आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात 12चा आकडा आहे. वाद सुरू आहेत. मतदारांना संभ्रमात टाकण्यासाठी एक असल्याचा दिखावा करत आहात. आतून हे सर्व एकमेकांचे पाय खेचत असल्याचे मला माहीत आहे".
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर यांचे नाव का दिले, यावर विधान करताना हिंदू धर्माचा अभिमान सांगितला होता. अत्याचारानंतर देखील हिंदू धर्माचा त्याग केला नाही. औरंगजेबाचे नाव शहरात असू शकत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सभांमधून 'आपण एक झाले, तर सुरक्षित आहोत', 'एक है तो सैफ है', अशी घोषणा केली होती. AIMIM असदुद्दीन ओवैसींनी या विधानावर देखील हल्ला चढवला. ओवैसी म्हणाले, "मोदीजी, ऐका, जर अनेक असतील तर ते अभंग आहेत". भारतात अनेक लोक आहेत. मराठा, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, तमिळ, पंजाबी आणि तेलगू भाषिकही आहेत. भारत एकसंध आहे. सर्वांनी एकत्र यावे, असे पंतप्रधान मोदी म्हणतात".
AIMIM असदुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले, "कोणीही आपली संस्कृती सोडत नाही. तसं होत नाही. संस्कृती सोडल्यास काय होईल. कुणी गुजराती संस्कृती सोडेल. यातून भारतातील विविधता संपुष्टात यावी, अशी मोदींची इच्छा आहे". मोदी आणि आरएसएस सर्वांना एकत्र करायचे आहे. संविधान असेल तर आदर आहे, असा चिमटा ओवैसी यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.