Hingoli BJP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र अतिश दांडेगावकर यांनी अखेर आज गुरूवारी (ता. 26) मुंबईत आपल्या समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. सहकार क्षेत्रात काम करणारे उमदे नेतृत्व दांडेगावकर यांच्या पक्ष प्रवेशाने अतिश पर्व सुरू झाले आहे, असे गौरवोद्दगार चव्हाण यांनी काढले. तसेच अतिश दांडेगावकर व त्यांच्या समर्थकांचा पक्षात योग्य सन्मान राखण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
अतिश दांडेगावकर हे बुधवारी (ता.25) आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले होते. आणि लगेचच गुरूवारी (ता. 26) त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरला होता. त्यानूसार त्यांनी शेकडो समर्थकांसह भाजपा मध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांच्या गळ्यात भगवा रूमाल टाकत त्यांचे पक्षात स्वागत केले. सहकार क्षेत्रात काम करणारे उमदे नेतृत्व दांडेगावकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे आता 'आतिश' पर्व सुरू झाले आहे अशा शब्दात चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास होत आहे. सर्व समाजघटकांचा विकास आणि प्रगती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. या दोघांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आतिश दांडेगावकर यांच्यासोबत त्यांच्या असंख्य समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हिंगोली येथे पिकणाऱ्या पिकांतून या परिसराचा विकास आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी काय करता येईल? ही जबाबदारी आता आतिश दांडेगावकर यांच्यावर सोपवत असल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले.
या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू आणि सर्वांचा पक्षात उचित सन्मान राखला जाईल, अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली. तर देशाचा आणि राज्याचा सर्वसमावेशक विकास हा एनडीए आणि भाजपा महायुती सरकारच करू शकते. म्हणूनच विकासकार्यात सहभागी होण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला असल्याची भावना आतिश दांडेगावकर यांनी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केली.
आतिश दांडेगावकर यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसमत तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रमेश सानप, जिल्हा सरचिटणीस गणेश कमळू, महिला राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस रत्नमाला शिंदे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील मुळे, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर इंगोले, राम झुंझुर्डे, माजी संचालक अमोल मुळे आदींचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.