Sanjay Jadhav : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको करणे भोवले; खासदार संजय जाधव यांच्यासह शेतकरी आंदोलकांवर गुन्हे दाखल!

Shaktipith Highway Land Acquisition Protest : शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या विरोधात परभणीत खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. याप्रकरणी शेतकरी आंदोलकांवर व खासदारांसह गुन्हे दाखल करण्यात आले.
Shiv Sena (UBT) MP Sanjay Jadhav leads farmers during Shaktipith Highway protest at Singanapur Phata, where police later registered FIR against agitators.
Sarkarnama
Published on
Updated on

Shaktipith Mahamarga Protest News : शक्ती पीठ महामार्गासाठी जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या जमीन अधिग्रहणाला विरोध दर्शवत आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. शक्ति पीठ महामार्गाला जमीन देण्यास परभणीसह मराठवाड्यातील नांदेड, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. परभणी जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गासाठी जमीन देण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले होते. दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवर बळाचा वापर करत आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळले होते.

23 रोजी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथे खासदार संजय जाधव यांनी सर्वपक्षीय रास्ता रोकोचे आयोजन केले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधले, कॉम्रेड माधुरी क्षीरसागर, प्रसाद गोरे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकरी आंदोलकाविरोधात दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

'एकच जिद्द, शक्ति पीठ रद्द' अशा घोषणा देत आंदोलक शेतकरी आक्रमक झाले होते. सकाळी दहा वाजता सिंगणापूर फाटा येते खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. सरकार विरोधात घोषणाबाजी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी पोलीसांनी संबंधित आंदोलकांवर गुन्हे दाखल केले.

खासदार संजय जाधव यांनी शेतकऱ्यांचा शक्ति पीठ महामार्गाला जमीनी देण्यास विरोध आहे तर मग त्यांच्या प्रशासन जबरदस्ती का करत आहे? हा खटाटोप कशासाठी केला जात आहे? असा सवाल केला. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जमीनी बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न सरकारने करू नये, असा इशारा त्यांनी आंदोलना दरम्यान दिला होता.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Jadhav leads farmers during Shaktipith Highway protest at Singanapur Phata, where police later registered FIR against agitators.
Latur District : अमित देशमुखांच्या प्रयत्नांना यश : लातूरच्या उद्योग क्षेत्राला बूस्ट; दोन बड्या प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू

दरम्यान, जमीन अधिग्रहणाच्या विरोधात सहजपूर जवळा येथील शेतकरी चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणालाही बसले आहेत. या आंदोलनाला काल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन मगच कुठलाही निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले होते.

Shiv Sena (UBT) MP Sanjay Jadhav leads farmers during Shaktipith Highway protest at Singanapur Phata, where police later registered FIR against agitators.
Ambadas Danve : हिबानामाचा वाद पेटला : आरोप-खुलाशाचे सत्र सुरू; संदीपान भुमरेंच्या स्पष्टीकरणावर अंबादास दानवेंचे पुन्हा '5' प्रश्न!

दरम्यान, जमीन अधिग्रहणाच्या विरोधात सहजपूर जवळा येथील शेतकरी चार दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणालाही बसले आहेत. या आंदोलनाला काल मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नये, शेतकऱ्यांच्या भावना समजून घेऊन मगच कुठलाही निर्णय घ्यावा, असे मत व्यक्त केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com