Beed Death Case : बीडमध्ये भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्याचं टोकाचं पाऊल : दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळी गळफास

Beed Sarpanch Husband Death: आष्टी पंचायत समितीचे माजी सदस्य असलेले बाबासाहेब गर्जे यांचे हे आपल्या कुटुंबासह आष्टी-शेकापूर रस्त्यावर असलेल्या घरात राहत होते. रविवारी गर्जे रोजच्या प्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत.
A rural farm area in Beed district where the sarpanch’s husband was found dead, prompting a police investigation into the Beed death case
A rural farm area in Beed district where the sarpanch’s husband was found dead, prompting a police investigation into the Beed death caseSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 23 Feb : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याच्या हातोला ग्रामपंचायतीच्या विद्यमान महिला सरपंचाच्या पतीने शेतातील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सरपंचाच्या पतीने हे टोकाचं पाऊल का उचललं? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आष्टी पंचायत समितीचे माजी सदस्य असलेल्या बाबासाहेब ज्ञानदेव गर्जे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. बाबासाहेब गर्जे यांचे हे आपल्या कुटुंबासह आष्टी-शेकापूर रस्त्यावर असलेल्या घरात राहत होते.

रविवारी गर्जे हे रोजच्या प्रमाणे आपली दैनंदिन कामे आटोपून घराबाहेर पडले होते. सायंकाळी ते आपल्या घराजवळ असलेल्या शेतात गेले. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी न आल्याने त्यांचे कुटुंबिय त्यांना बोलावण्यासाठी शेतात गेले. तेव्हा समोरचे दृष्य पाहून कुटुंबियांनी एकच आक्रोश केला.

A rural farm area in Beed district where the sarpanch’s husband was found dead, prompting a police investigation into the Beed death case
PMC Election Result : पुणे महापालिका निवडणुकीत डिपॉझिट जप्तीचा विक्रम! तब्बल 750 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; शिंदेंची शिवसेना पहिल्या क्रमांकावर तर भाजपच्या...

शेतातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बाबासाहेब गर्जे यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्जे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर आली आहे. आष्टी पंचायत समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत होते. तर त्यांच्या पत्नी या हातोला गावच्या विद्यमान सरपंच आहेत.

A rural farm area in Beed district where the sarpanch’s husband was found dead, prompting a police investigation into the Beed death case
Fadnavis On Ajitdada : विमान अपघाताच्या आदल्या दिवशी कॅबिनेटमध्ये काय घडलं होतं? तो पाऊण तास काय चर्चा झाली; फडणवीसांनी सांगितली आठवण

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्जे यांचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. गर्जे यांनी नेमकी आत्महत्या का केली? त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का? याबाबत पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी गर्जे यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com