Sanjana Jadhav, abdul Sattar Sarkarnama
मराठवाडा

Aurangabad DCC Bank election : औरंगाबाद बँक निवडणुकीत ट्विस्ट? आमदार संजना जाधव, समीर सत्तार यांना धक्का की दिलासा ? 17 जूनला फैसला होणार

MLA Sanjana Jadhav News : समीर सत्तार आणि संजना जाधव यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

Jagdish Pansare

Shivsena news : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणूक 2026 साठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या 214 अर्जांपैकी कन्नडच्या शिवसेना आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे सुपुत्र समीर सत्तार यांच्यासह अनेकांचे उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले. समीर सत्तार आणि संजना जाधव यांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्याने जिल्हा बँकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

या दोघांसह इतर चार जणांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपले अपील दाखल केले आहे. यावर 17 जून रोजी सुनावणी आणि निकाल दिला जाणार आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काही राजकीय डाव आहे का? अशी शंका उपस्थित केली होती. शिवाय अर्ज फेटाळताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विरोधकांचा जो आक्षेप मान्य केला तो हास्यास्पद असून अपिलानंतर आमचा अर्ज शंभर टक्के टिकेल, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर 17 जून रोजी आमदार संजना जाधव आणि समीर सत्तार यांच्या अर्जावर काय निकाल येतो? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठीच्या अर्ज छाननीत बाद झालेल्या संजना जाधव यांच्यासह आणखी चार जणांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. आज (ता. 11) पर्यंत एकूण 8 उमेदवारांनी 9 अपील दाखल करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

जिल्हा बँकेच्या 21 संचालकपदासाठी 158 उमेदवारांनी 214 अर्ज दाखल केले होते. छाननी प्रक्रिया आणि आक्षेप घेतलेल्या 18 अर्जांवरील सुनावणीनंतर 45 उमेदवारांचे अर्ज बाद (अवैध) ठरवण्यात आले. यापैकी आतापर्यंत 8 जणांनी या निर्णयास विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल करत आव्हान दिले आहे. यात अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर सत्तार, प्रनिकेत पाटील, इंदुमती साहेबराव पाटील यांनी प्रत्येकी एक तर सुवर्णा जाधव यांनी 2 अपील काल (ता.10) दाखल केले. आज (ता.11) रोजी संजना जाधव, मनोज राठोड, रितेश मुनोत व प्रदीप शिंदे या चार जणांनी अपील दाखल केल्याचे विभागीय सहनिबंधक संतोष बिडवई यांनी सांगितले.

17 तारखेला सुनावणी

छाननीत अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना अपील दाखल करण्यासाठी अजून एक दिवस म्हणजे उद्या (ता.12) पर्यंत अपील दाखल करता येईल. सर्व अपीलांवर 17 जूनला एकाच दिवशी सुनावणी घेतली जाणार असल्याचे विभागीय सहनिबंधकांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT