District Bank Election: जिल्हा बँकेत घराणेशाहीला ऊत! सत्तार, भुमरे, शिरसाट यांचे राजकीय वारस निवडणूक रिंगणात

Aurangabad District Bank Election: औरंगाबाद जिल्हा बँकेत राजकीय नेत्यांचा बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न हा शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्या राजकीय वारसांना बँकेचे संचालक करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचं दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून स्पष्ट होत आहे.
Aurangabad District Bank
Aurangabad District Bank
Published on
Updated on

Marathwada Politics: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे, त्यांचे कल्याण झाले पाहिजे. त्यांना वेळेवर कर्ज, सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांची काळजी वाहत आपण कसे बिनविरोधसाठी तडजोड करायला तयार आहोत, हे दाखवण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. मात्र, बिनविरोधचा प्रयत्न हा शेतकऱ्यांसाठी नाही तर आपल्या राजकीय वारसांना बँकेचे संचालक करण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचं दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून स्पष्ट होत आहे.

Aurangabad District Bank
ममता बॅनर्जींचा CM पद सोडण्यास नकार; पुढे काय होणार? राज्यपालांसमोर आहेत 'हे' 2 पर्याय...

सहकार कायद्याच्या नव्या कायद्याचा फटका बँकेच्या निम्म्या संचालक मंडळाला बसला. परंतू आमदार, खासदार, मंत्र्यांना बँकेतील सत्ता सोडवत नाही. आपण नाही तर किमान आपले वारस बँकेत असावेत या अट्टाहासापोटी अनेक नवे चेहरे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरले आहेत.

4 जुलै रोजी 21 संचालक मंडळाच्या निवडीसाठी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात मोठी गर्दी झाली होती. यामध्ये अनेक माजी संचालक आणि भावी संचालक दिसत होते. आज एकूण अर्जांची संख्या ही २१४ वर गेल्यामुळे संचालक होण्यासाठी किती प्रचंड स्पर्धा आहे याचा अंदाज येतो.

Aurangabad District Bank
Farmer Loan Waiver: सरकारची कर्जमाफी योजना फसवी! केवळ दोन-तीन टक्के शेतकर्‍यांनाच मिळणार लाभ?

सावे, शिरसाट यांचा अर्ज

जिल्ह्यातील दोन मंत्री देखील जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. राज्याचे बहुजन कल्याण मंत्री तथा भाजपा नेते अतुल सावे, जिल्ह्याचे पालक तथा राज्याचे सामजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय काँग्रेसचे खासदार कल्याण काळे, भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण, शिवसेनेचे विलास भुमरे, रमेश बोरनारे, रंजना (संजना जाधव), ठाकरेंच्या पक्षाचे अंबादास दानवे यांचा समावेश आहे.

माजी संचालकांचे पुत्र प्रेम

सहकार विभागाच्या नव्या कायद्यामुळे निवडणूक लढण्यास अपात्र ठरलेल्या माजी संचालक असलेल्या आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांचे सुपूत्र समीर सत्तार यांना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरे माजी संचालक तथा जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी आपले चिरंजीव आमदार विलास भुमरे यांना जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी स्वतः आणि त्यांच्या कन्या नगरसेवक हर्षदा शिरसाट यांची उमेदवारी दाखल केली आहे. भुमरे यांच्या घरातून आमदार विलास भुमरे आणि चुलत बंधू राजू भुमरे या दोघांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

Aurangabad District Bank
Abhijeet Dipke: कॉकरोच पार्टीचा संस्थापक अभिजीत दिपके उद्या भारतात येणार; तत्पूर्वीच त्याच्या कुटंबानं सोडलं घर

शिरसाट यांना सूचक सत्तार

जिल्ह्याच्या राजकारणात एकाच पक्षात असून ज्या दोन नेत्यांमधून विस्तवही जात नव्हता ते पालकमंत्री संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर दिलजमाई झाल्याचे दिसून आले. संजय शिरसाट यांनी अनुसूचित जाती मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या एका अर्जावर सूचक म्हणून चक्क अब्दुल सत्तार यांनी स्वाक्षरी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com