Abdul Sattar : भाजप अन् शिवसेनेच्या नेत्यांशी एकाच वेळी घेतलेला पंगा अंगलट; जिल्हा बँकेतील धक्क्यानंतर अब्दुल सत्तार राजकारणातून बाहेर फेकले जाणार?

Abdul Sattar, Aurangabad ADCC Bank, Samir Sattar: औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत समीर सत्तार यांचा अर्ज बाद झाल्याने आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसला. भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा चर्चेत आले.
 Sameer Sattar  Abdul Sattar
Sameer Sattar Abdul Sattarsarkarnama
Published on
Updated on

Aurangabad ADCC Bank News : राजकारणात 'हम करे सो कायदा' अशी परिस्थिती फार काळ चालत नाही. शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार सध्या याचा अनुभव घेत आहे. एकीकडे भाजपा विरोधात विधान करत त्या पक्षाला अंगावर घेतले, तर दुसरीकडे स्वपक्षीय नेते पालकमंत्री संजय शिरसाट व इतरांशी उघडपणे घेतलेला पंगा अब्दुल सत्तार यांना चांगलाच महागात पडला आहे. आतापर्यंत सत्तार यांचे मनमानी राजकारण खपवून घेतले गेले.

काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यानंतर काही प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेतही सत्तार यांना बळ दिले गेले. पुढे याच बळाच्या जोरावर सत्तार यांनी या दोन्ही पक्षांना वेठीस धरले. महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद न मिळाल्याने नाराजी, तर युतीच्या सरकारमध्ये बढती मिळाल्यानंतरही अब्दुल सत्तार कधीच समाधानी राहिले नाही. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सर्वाधिक निधी अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात दिला. कृषी मंत्री हे महत्त्वाचे पद त्यांना मिळाले.

 Sameer Sattar  Abdul Sattar
Aurangabad DCC Bank : अब्दुल सत्तारांना सर्वात मोठा धक्का : औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत समीर सत्तारांचा अर्ज बाद

पण ओव्हर काॅन्फीडन्समध्ये असलेल्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या वाचाळ वक्तव्य आणि उठसूठ दबावतंत्राचा वापर करुन पक्षाला वेठीस धरण्याचे काम केले. यातूनच त्यांचे मंत्रीपद गेले, मात्र 'हम नही सुधरेंगे' प्रमाणे सत्तार यांचा एककलमी कार्यक्रम सुरूच होता. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तार यांच्या भाषेत त्यांचा 'बिस्मिल्ला' होता होता राहिला. ते अवघ्या 2420 मतांनी कसेबसे निवडून आले. दोन अडीच वर्ष मग त्यांनी मतदारसंघ वगळता इतर कुठे फारसे लक्ष दिले नाही.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेपासून अलिप्त राहिलेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र रस दाखवला. मुलाला झेडपीची उमेदवारी देत निवडून आणले. सिल्लोड नगरपरिषदेची सत्ता राखली तिथे दुसर्‍या मुलाला नगराध्यक्ष केले. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचे सदस्य फोडून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपालाच सत्ते बाहेर ठेवण्याची खेळी सत्तार यांनी आखली. पण चाणाक्ष भाजपा नेत्यांनी सत्तार यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला आणि शिवसेनेला सत्ते बाहरे ठवले.

 Sameer Sattar  Abdul Sattar
Aurangabad DCC Bank : शिंदे-फडणवीस म्हणतात जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढा, पण एकमेकांच्या अर्जावर आक्षेप घेत 'महायुती'त महाभारत!

झेडपीत प्लान फसला तरी जिल्हा बँकेत तोच प्रयोग..

भाजपाला डावलून सत्ता मिळवण्याचा प्रयोग झेडपीत फसल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्यासमोर जिल्हा बँकेची सत्ता टिकवण्याचे मोठे आव्हान होते. ही बँक ताब्यात घेण्यासाठी भाजपाचे मंत्री अतुल सावे आणि स्थानिक भाजप नेते कामाला लागले होते. विधान परिषद निवडणुकीतून माघारीच्या बदल्यात मुलाला जिल्हा बँकेचे अध्यक्षपद आणि सहा संचालक असा सौदा सत्तार यांनी भाजपाच्या वरिष्ठांसोबत केला.

विधान परिषदेत महायुतीच्या उमेदवाराला अपशकून नको, म्हणून सत्तार यांच्या मागण्या भाजपाने मान्य केल्या. समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि इकडे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. समीर यांनी आपला उमेदवारी अर्ज केला. आपला आता अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला या थाटात सत्तार पिता-पूत्र होते.

 Sameer Sattar  Abdul Sattar
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

परंतु करेक्ट कार्यक्रम करण्यात माहीर असलेल्या भाजपाने डाव साधलाच. समीर सत्तार यांचा अर्ज छाननीत बाद झाला आणि अब्दुल सत्तार यांच्या शब्दात त्यांचा 'बिस्मिल्ला' झाला. विधान परिषदेच्या निवडणुकीत घेतलेली माघार, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी इच्छा नसताना जुळवून घेणे या सगळ्यावर आता पाणी फिरण्याची वेळ आली आहे.

सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज बाद करण्यासाठी दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे सांगत अपीलात आमचा अर्ज शंभर टक्के टिकेल असा दावा केला आहे. आता अपीलाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकूणच अब्दुल सत्तार यांना एकाचवेळी भाजपा आणि शिवसेनेतील नेत्यांशी नडणे चांगलेच महागात पडणार असे दिसते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com