औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार अभिमन्यू पवार यांनी नऊ मुस्लिम उमेदवारांना जागा देत मोठा राजकीय डाव टाकला.
या निर्णयामुळे मुस्लिम समाजाचा पवारांकडे झुकाव वाढू शकतो, तसेच औसातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता दिसते.
विरोधकांमध्ये खळबळ उडवणारा हा पवारांचा मास्टरस्ट्रोक आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो.
Local Body Election 2025 : औसा नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर करून अर्जही दाखल केला असला तरी भाजपने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार भाजप मूळ ओबीसी प्रवर्गातील नवा चेहरा नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरविण्याच्या तयारीत आहे. या खेळीने निवडणुकीतील मतांचा संपूर्ण आकडा बदलू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे.
मूळ ओबीसी उमेदवार आल्यास ओबीसी मतदारांचा पूर्ण कल या उमेदवाराकडे वळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लिंगायत व मुस्लिम मतदारांमध्ये असलेला दुरावा हा उमेदवार कमी करू शकतो, त्यामुळे मुस्लिम मतांची भर पडेल अशी भाजपची अपेक्षा आहे. एका बाजूला माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या भगिनींची उमेदवारी तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांना पसंत असलेला नवा ओबीसी चेहरा. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार अशीच चिन्हे आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अफसर शेख यांच्या भगिनी परवीन शेख यांना उमेदवार केले आहे. मात्र, ओबीसी आरक्षण असताना मुस्लिम समाजातील मूळ ओबीसी व्यक्तीला उमेदवारी न दिल्याने समुदायातील नाराजी वाढत असल्याचे दिसत आहे. या नाराजीचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. त्यातच आमदार अभिमन्यू पवारांनी 8 ते 9 मुस्लिम उमेदवारांना भाजपचे तिकीट दिल्याने राष्ट्रवादीकडे असलेले मुस्लिम मत एकसंध राहण्याची शक्यता कमी होत आहे.
मूळ ओबीसीला पसंती मिळणार का?
भाजपकडे लिंगायत आणि ओबीसी दोन्ही प्रवर्गांतील तिकीट इच्छुकांची संख्या मोठी आहे. पण मुस्लिम मतदार लिंगायत उमेदवाराकडे वळतील का? या शंकेमुळे भाजपने मूळ ओबीसी चेहऱ्यावर विश्वास ठेवण्याची रणनीती आखली आहे. लिंगायत समाज नाराज होऊ नये म्हणून आमदार पवार समतोल साधत असून, कोणीही उमेदवाराविरोधात जाणार नाही याची काळजी त्यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे भाजपत बंड होण्याची शक्यता जवळजवळ शून्य झाली आहे.
भाजपकडे मुस्लिम मतदारांचा ओढा
औसा नगरपालिकेच्या निवडणुकीत इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात मुस्लिम उमेदवारांनी भाजपकडून तिकिटाची मागणी केली आहे. अनेक मुस्लिम तरुण भाजप उमेदवारांना जिंकवण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी सर्व बाजूंनी होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. जर चर्चेप्रमाणे भाजपने मूळ ओबीसी उमेदवार दिला, तर लिंगायत चेहऱ्याला विरोध करणारे अनेक मुस्लिम मतदानासाठी भाजपकडे झुकतील, असा राजकीय अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे औसा नगरपालिका निवडणूक अनपेक्षित वळणांनी भरलेली ठरणार आहे.
एकीककडे देश, राज्य पातळीवरील निवडणुकांमध्ये एकही मुस्लिम उमेदवार न देणाऱ्या भाजपाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र धोरण बदलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार आणि सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिमन्यू पवार यांच्याकडूनच आपल्या मतदारसंघातील नगरपालिका निवडणुकीसाठी चक्क नऊ मुस्लिम उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या असल्या तरी हा त्यांचा मास्टर स्ट्रोक असल्याचा दावा केला जात आहे.
1. औसा नगरपालिकेत नऊ मुस्लिम उमेदवार का उतरवले गेले?
मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आणि निवडणुकीत मजबूत सामाजिक समीकरण तयार करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
2. आमदार अभिमन्यू पवारांचा हा निर्णय राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाचा आहे?
हा एक रणनीतीपूर्ण डाव मानला जात असून आगामी निवडणुकीत परिणामकारक ठरू शकतो.
3. विरोधकांची काय प्रतिक्रिया आहे?
विरोधक या हालचालीमुळे सावध झाले असून नवीन रणनीती आखण्याची चर्चा सुरू आहे.
4. या उमेदवारांची निवड कोणत्या निकषांवर झाली?
स्थानिक प्रभाव, समाजातील स्वीकार आणि संघटनात्मक मजबूतपणा पाहून उमेदवार निवडल्याचे सांगितले जाते.
5. औसा नगरपालिकेतील निवडणूक कोणत्या दिशेने वळू शकते?
या निर्णयामुळे मुस्लिम मतदारांचा कल बदलण्याची शक्यता असून निवडणूक अधिक चुरशीची होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.