MLA Abhimanyu Pawar : मतदारसंघाचे मालक होऊ नका! अजितदादांच्या जिल्हाध्यक्षाने आमदार अभिमन्यू पवारांवर तोफ डागली..

A major political stir as NCP's district president accuses BJP MLA Abhimanyu Pawar of serious misconduct : काल तहसील कार्यालयासमोर झालेल्या 'खेळ मांडला' आंदोलनात डॉ. अफसर शेख यांनी भाजपा आमदार अभिमन्यू पवारांवर गंभीर आरोप केले.
MLA Abhimanyu Pawar Crisis With NCP News
MLA Abhimanyu Pawar Crisis With NCP NewsSarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण

Ausa Constituency News : राज्यात सत्तेत हातात हात घालून कारभार करणाऱ्या अजित पवारांच्या जिल्हाध्यक्षांनी भाजपा आमदार अभिमन्यू पवारांवर गंभीर आरोप करून या मतदारसंघाचे मालक बनण्यापेक्षा पालक बनण्याचा सल्ला दिला आहे. शहरात आणि मतदारसंघात सुरू असलेली विकासकामे ही बोगस होत असून यातून टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप केला आहे.

जुन्या बसस्थानाकाचा विकास करायचा सोडून नवीन बसस्थाक उभारून शहरातील लोकांची अडचण केली तर दुसरीकडे औसा तहसीलचे विभाजन करून औशाचे वैभव संपविण्याचा प्रयत्न आमदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) जिल्हाध्यक्ष अफसर शेख यांनी केला. औसा नगरपालिकेत सुरू असलेल्या भोंगळ कारभाराला भाजप जबाबदार असल्याचा ठपका ठेवत येथील तहसिल कार्यालयासमोर अफसर शेख युवा मंचच्या वतीने'खेळ मांडला'आंदोलन करण्यात आले.

यावेळी त्यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. महायुती सरकार मधील मित्रपक्ष एकत्रित असले तरीही औशात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव आहे. काल तहसील कार्यालयासमोर झालेल्या 'खेळ मांडला' आंदोलनात डॉ. अफसर शेख यांनी भाजपा आमदार अभिमन्यू पवारांवर (Abhimanyu Pawar) गंभीर आरोप केले. संतांच्या भूमीचे पावित्र्य अवैध धंद्यानी धोक्यात आले आहे. सगळीकडे दर्जाहीन कामे करुन टक्केवारी वसुलीचे धोरण जोपासले जात आहे. याच्या विरोधात उभे राहून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देवू.

MLA Abhimanyu Pawar Crisis With NCP News
MLA Abhimanyu Pawar News : अभिमन्यू पवारांच्या व्हिजनमध्ये राष्ट्रवादीचा खोडा! जिल्हाध्यक्ष शेख यांचा बोलवता धनी कोण?

शहरात मुलभूत सुविधा, आरोग्य यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.औसा एमआयडीसीचे विस्तारीकरण, शहरातील अवैध लॉज बंद करणे, अतिरिक्त लादलेली कर व घरपट्टी कमी करणे, जुन्या बसस्थानकाचा विकास करणे आदी बाबीवर शेख यांनी भाष्य केले. भाजपची ही मनमानी आम्ही चालू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार पवारांनी पाच वर्षात तालुक्याचे मालक होण्यापेक्षा पालक म्हणून राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

MLA Abhimanyu Pawar Crisis With NCP News
BJP Suresh Dhas son Sagar accident : भाजप आमदार धस यांच्या मुलाच्या वाहनाचा अपघात; धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यातल्या दोन मित्रपक्षात औशात झालेली बिघडी युतीला वेगळ्या मार्गवर घेऊन जाणारी ठरणार आहे. दरम्यान, अफसर शेख यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. ज्यांनी बोगस विकासकामांचा मार्ग औसेकरांना दाखविला त्यांनी आमच्यावर आरोप करणे हास्यास्पद आहे. ही सगळी नौटंकी केवळ उद्याची पालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरु आहे. कोण कसा आहे हे औशाची जनता जाणून आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे स्थानिक नेते किरण उटगे यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com