Mumbai News : राज्यातील 244 नगरपालिका व 44 नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मात्र, भाजपने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर केलेले नाहीत. गेल्या दोन दिवसापासून भाजपच्या कार्यालयात सर्व इच्छूक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. ते सर्व तयार करून ठेवले आहेत. हे अर्ज सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या आत दाखल करावे लागणार आहेत. मात्र शेवटची घटिका जवळ आली तरी बंडखोरी टाळण्यासाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपकडून त्यावेळेसच्या नगरपालिका निवडणुकीतील बंडखोरी पूर्णपणे रोखण्यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली असल्याचे समजते.
राज्यातील नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस सोमवारी (17 नोव्हेंबर) आहे. भाजपने (BJP) यंदाच्या निवडणुकीत बंडखोरी पूर्णपणे रोखण्यासाठी कमालीची गुप्तता पाळली आहे. भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. प्रत्येक प्रभागात दोन ते चार, तर काही ठिकाणी सहा-सहा इच्छुक उमेदवार उभे राहत असल्याने भाजपने या वेळी उमेदवार निवड प्रक्रियेत पूर्ण गोपनीयता अवलंबली आहे. विशेषतः नगराध्यक्ष पदासाठी देखील प्रत्येक ठिकाणी इच्छुक जास्त असल्याने सस्पेन्स ठेवला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सर्व इच्छुकांना पक्षाचे नाव लिहूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत एकाही कार्यकर्त्याने किंवा इच्छुकाने अपक्ष म्हणून अर्ज भरू नये, अशी स्पष्ट सूचना केली आहे. भरलेले अर्ज देखील थेट भाजपच्या स्थानिक कार्यालयात जमा करून घेण्यात आले आहेत. पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे कोण उमेदवार म्हणून पुढे येईल, याबाबत पक्षातून कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, असा हेतू स्पष्ट दिसून येतो.
भाजपकडून शेवटच्या क्षणी एबी फॉर्मही दाखल करण्यात येणार आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत कोणालाही अधिकृत उमेदवारी दिली जाणार नसल्याने शहरातील इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण कायम आहे. अनेक इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षाच्या वरिष्ठांकडे मुलाखती दिल्या असल्या तरी, मुलाखत दिलेल्या कोणत्याही इच्छुकाला उमेदवारी मिळणार याबाबत भाजपकडून सांगण्यात आले नाही.
प्रत्येक ठिकाणाच्या समीकरणचा विचार करून व भाजपने केलेल्या सर्वेक्षणात आघाडीवर असलेल्या सर्वसमावेशक, निष्कलंक आणि जनतेत मिसळून काम करणाऱ्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळेच भाजपने या वेळी बंडखोरीला पूर्णविराम देण्यासाठी ही नवी रणनीती अवलंबली आहे.
त्यासाठी भाजपने सर्वच ठिकाणी पक्षातील सर्व इच्छुक उमेदवारांना पक्षाचे नाव लिहूनच अर्ज दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अर्ज स्थानिकच्या भाजप कार्यालयात जमा करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपची निवडणुकीसाठीची ही गोपनीय रणनीती आहे. त्यामुळे सर्वत्र भाजपच्या उमेदाराविषयी गोपनीयता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.