ajit pawar sharad pawar sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar : विधानसभेपूर्वी अजितदादांना धक्का? बड्या नेत्यानं घेतली पवारसाहेबांची भेट; घरवापसीचे संकेत

Babajani Durrani : गुरूवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती.

Akshay Sabale

विधानसभेपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, बाबाजानी दुर्राणी यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारसाहेबांची भेट घेत घरवापसीची इच्छा व्यक्त केली आहे.

"मी मनाने शरद पवारसाहेबांसोबत आहे. मात्र, फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा बाकी आहे," असं बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितलं.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बाबाजानी दुर्राणी ( Babajani Durrani ) यांनी अजितदादांना साथ दिली. ते विधान परिषदेवर आमदार होते. आज ( 27 जुलै ) त्यांच्या आमदारकीची मुदत संपत आहे. मात्र, अजितदादांनी त्यांना पुन्हा संधी न देता परभणी जिल्ह्यातीलच राजेश विटेकर यांना विधान परिषदेवर संधी दिली. लोकसभेला विटेकरांनी अजितदादांच्या शब्दाखातर महादेव जानकर यांना जागा सोडली. त्याचे 'रिटर्न गिफ्ट' म्हणून अजितदादांना विटेकरांना आमदार केले. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी नाराज झाले.

गुरूवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांनी दुर्राणी यांच्या पाथरी येथील निवासस्थानी भेट घेत बंद दाराआड चर्चा केली होती. नंतर शुक्रवारी रात्री दुर्राणी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे शरद पवारसाहेबांची भेट घेत घरवापसीचे संकेत दिले आहेत. मी मनाने शरद पवारसाहेबांसोबत असल्याचं दुर्राणी यांनी म्हटलं.

दुर्राणी म्हणाले, "शरद पवारसाहेबांची भेट घेण्याचं कारण म्हणजे भविष्यात मला त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणे, याचा अर्थ प्रवेश झाल्यासारखाच आहे. मी 1985 पासून शरद पवारसाहेबांसोबत आहे."

"समविचारी पक्षासोबत काम करायला सोपे जाते. भिन्न भिन्न विचाराचे पक्ष जसे एका बाजूला भाजप आणि दुसऱ्या बाजून शिंदे शिवसेना यांच्यासोबत काम करणे अवघड आहे. कार्यकर्ते आणि मतदारांनाही अवघड जात आहे. अजितदादा सुद्धा फुले, शाहू आंबेडकरांच्या विचारानेच काम करतात. पण, त्याठिकाणी दोन्ही बाजूने असलेल्या पक्षामुळे आमच्यासारख्या अल्पसंख्याक विचाराच्या कार्यकर्त्यांची विटंबना होत आहे," अशी खंत दुर्राणी यांनी व्यक्त केली.

"मी मनानं शरद पवारसाहेबांसोबत आहे. फक्त प्रवेशाची अधिकृत घोषणा बाकी आहे. पवारसाहेब आणि आम्ही भविष्यात एका विचारानं काम करू. त्यामुळे लवकरच मोठी बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रवेश होणं म्हणजे काही नवीन नाही. पवारसाहेबांसोबत काम करणं म्हणजे प्रवेश केल्यासारखंच आहे," असं मोठं विधान बाबाजानी दुर्राणी यांनी केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT