Bajrang Sonwane News : बजरंग बाप्पाचं नशिबच फळफळलं...! सुप्रिया सुळेंनंतर शरद पवारांसोबत 'हवाहवाई' प्रवासाचा योग

Beed Political News : पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नेत्यांचे दिल्ली-मुंबई दौरे सातत्याने सुरु आहेत. सोमवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सुप्रिया सुळे व खासदार बजरंग सोनवणे यांचा मुंबई ते दिल्ली एकाच विमानातून प्रवास झाला.
Sharad Pawar, Bajrang Sonavane
Sharad Pawar, Bajrang SonavaneSarakarnama
Published on
Updated on

Beed News : नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट मिळवलेल्या बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का दिला होता. बीडमधील या हायव्होल्टेज लढतीत बाजी मारल्यामुळे सोनावणे यांची राज्यभर चर्चा आली होती. खासदार झाल्यानंतर त्यांचं नशीबच फळफळलं असल्याचं बघायला दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात संसदररत्न सुप्रिया सुळे यांच्यासोबत विमान प्रवास केलेल्या बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत प्रवासाचा योग आला. यानंतर त्यांनी अविस्मरणीय क्षण अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नेत्यांचे दिल्ली-मुंबई दौरे सातत्याने सुरु आहेत. सोमवारीच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya sule) व खासदार बजरंग सोनवणे यांचा मुंबई ते दिल्ली एकाच विमानातून प्रवास झाला.

या प्रवासादरम्यान खुद्द सुप्रिया सुळे यांनी बजरंग सोनवणे यांच्यासोबत सेल्फी काढून सोशल मिडीयावर पोस्ट केली होती. यानंतर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांचा एकाच विमानातून शेजारीबसून प्रवास झाला.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला शनिवार, रविवार सुटी असल्याने पवार राज्यात परतले. दोघेही दिल्ली ते संभाजीनगर एकत्र आल्यानंतरर खासदार बजरंग सोनवणे यांनी सोशल मिडीयावर अविस्मरणीय क्षण अशी भावना व्यक्त केली आहे. एकाच आठवड्यात दिल्लीला जाताना खासदार सुप्रिया सुळे आणि येताना पक्षप्रमुख शरद पवार असा विमानप्रवास करण्याची संधी बजरंग सोनवणे यांना मिळाली.

Sharad Pawar, Bajrang Sonavane
Jayant Patil News : राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा, जयंत पाटलांचा चिमटा; म्हणाले, 'ते स्वतःसाठी लढतात का?'

दरम्यान, अविस्मरणीय क्षण! देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांच्या शेजारी बसून विमानप्रवास आणि साहेबांशी माझा हृद्य संवाद..शरदचंद्र पवार साहेब हे केवळ नाव नाही तर एक संपूर्ण विचार आहे, याची प्रत्येक क्षणाला प्रचिती आली. दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर केलेला हा विमान प्रवास माझ्या आयुष्यातील दुर्मिळ क्षणांपैकी एक आहे.

प्रत्येक क्षेत्रातील विषयाबाबतीत आदरणीय पवार साहेबांनी माझ्याशी सखोल चर्चा केली. बीड जिल्ह्याविषयी त्यांची खडान् खडा माहिती तसेच जिल्ह्याच्या कृषी, सिंचन, विकासविषयक सखोल माहितीने आश्चर्यचकित झालो. अनेक जुन्या आठवणींना यावेळी त्यांनी उजाळा दिला. साहेब, आपण दिलेल्या प्रेमाने भरून पावलो. आपल्या मार्गदर्शन आणि स्नेहाचा हा हात माझ्या पाठीवर सतत राहो, ही पांडुरंगचरणी प्रार्थना करतो. अशा भावना बजरंग सोनवणे यांनी सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.

Sharad Pawar, Bajrang Sonavane
Babajani Durani: अजितदादांना धक्का; नाराज दुर्राणींचे घरवापसीचे संकेत, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com