Beed : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या सभेपूर्वी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. परळी येथील त्यांचे निकटवर्तीय, विश्वासू सहकारी बबन गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंडेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
बबन गित्ते यांना परळीतून धनंजय मुंडे यांच्याविरोधात उत्तरविण्याचा राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) प्रयत्न आहे. पवारांच्या भाषणापूर्वी बबन गित्ते यांचे भाषण होण्याची शक्यता आहे. गित्ते यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मुंडे यांना मोठा धक्का देण्यात पवार गट यशस्वी झाला असल्याची चर्चा आहे.
पवारांची आज (गुरुवारी) दुपारी बीडमध्ये सभा होत आहे. बबन गित्ते यांचे बीडमध्ये मोठे प्रस्थ आहे. ते मुंडे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. सभेसाठी पवार संभाजीनगर येथून बीडकडे रवाना झाले आहेत. बीडमध्ये पोचल्यानंतर ते जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बीड नाक्यावरून मोठी रॅली काढण्यात येणार आहेत. रॅलीत वाहनाचा मोठा ताफा असणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून बीड शहरात मोठे शक्तिप्रदर्शन करण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न असणार आहे.
महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी जाहीर सभेतून पवार विरोधकांवर तोफ डागणार आहेत.सायंकाळी चार वाजता ते बीड येथून छत्रपती संभाजीनगर निघणार आहेत.सभेतून शरद पवारांच्या निशाण्यावर कोण असणार? ते हे नेमकं काय बोलणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील सभेनंतर आता दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर होत आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.