Dhule Violence News : सांगवी दंगल प्रकरणी मोठी अपडेट ; आणखी नऊ जणांना अटक

Crime News : दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरु आहे.
Dhule Crime News
Dhule Crime NewsSarkarnama
Published on
Updated on

Dhule : सांगवी (ता. शिरपूर) परिसरात बॅनर फाडण्याच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन दंगल झाली होती. याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात आणखी नऊ जणांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 29 जणांना अटक करण्यात आली आहे. आज (गुरुवार) ताब्यात घेतलेल्या नऊ व आणखी तीन जणांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत.

Dhule Crime News
Dharmarao Baba Atram News : पवारांनी ठणकावल्यानंतरही धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, "शरद पवार हे आमचे गुरू, त्यांचे फोटो लावणारच..

सांगवीच्या दंगलीत जमावाने महामार्गावर रास्ता रोको केला होता. जमावाला शांत करण्यासाठी शिरपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीराम पावरा घटनास्थळी पोचले होते. ग्रामपंचायतीजवळ त्यांना जमावाने गराडा घातला. पण बॅनर फाडणाऱ्यांना आमच्या ताब्यात द्यायला सांगा, अशी मागणी काहींनी केली.

"आपण संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यास पोलिसांना सूचना देऊ," अस पावरा यांनी जमावाला सांगितलं. पण संतप्त जमाव ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पावरा पोलिसांसह महामार्गावर असलेल्या जमावाकडे जाण्यासाठी निघाले असताना त्यांच्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. जमावाने पावरा यांच्या स्कॉर्पिओ गाडीची तोडफोड केली होती.

Dhule Crime News
Bharat Gogawale News:..तर माझी बायको आत्महत्या करेल ; मंत्रिपदाला उशीर का ? गोगावलेंनी सांगितले धमाल किस्से

सांगवी, सारणपाडा या दोन गावांमध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेत गाड्यांचे मोठे नुकसान झाले. तर 15 पोलीस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक जखमी झाले आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस तपास करत आहेत. दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याचे सत्र सुरु आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com