Bageshwar Dham News  Sarkarnama
मराठवाडा

Bageshwar Dham News : `बागेश्वर धाम` सरकारच्या दरबारात आज फडणवीस ...

Jagdish Pansare

Marathwada BJP News : `बागेश्वर धाम` चे प्रसिध्द कथाकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील दरबारात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. (Bageshwar Dham News) दोन महिन्यापुर्वी शास्त्री यांचा दरबार नागपूरमध्ये भरवण्यात आला होता, तेव्हाही फडणवीसांनी तिथे हजेरी लावत त्यांचे दर्शन घेतले होते. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या पुढाकारातून दोन दिवसांपासून शहरात धीरेंद्र शास्त्री यांची रामकथा व दरबार सुरू आहे.

या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून आज सायंकाळी समारोपच्या आरतीली देवेंद्र फडणवीस उपस्थीत राहणार आहेत. (BJP) दरम्यान, हनुमान भक्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांनी आज खुलताबाद येथील जागृत भद्रा मारोतीचे दर्शन घेऊन पूजा केली.

(Devendra Fadnavis) तसेच बारा ज्योतीर्लिंगापैकी एक असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन अभिषेकही केला. सनातन धर्म आणि प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या धीरेंद्र शास्त्री यांच्या `परची` (चिठ्ठी) काढून भविष्य वर्तवण्यामुळे ते वादग्रस्त ठरत आहेत.

अंधश्रद्धा निर्मुल समितीने शास्त्री यांच्या चमत्काराला ढोंग म्हणत त्यांच्या दरबारावर बंदी घालण्याची मागणी केली होती. छत्रपती संभाजीनगरात या संदर्भात शास्त्री यांना विचारले असता अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले फक्त टीव्हीवर बोलतात, त्यांनी प्रत्यक्ष येऊन चर्चा करावी, असे आवाहन दिले. (Dr.Bhagwat Karad) त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तुम्ही आम्हाला बोलवा आणि यायला तयार आहोत, असे म्हणत प्रतिआव्हान दिले होते.

दरम्यान, बागेश्वर धाम यांच्या दरबारामुळे तीन दिवसांपासून शहरातील वातावरण हिंदुत्वमय झाले आहे. भाजपसह शिंदेसेनेचे आमदार, मंत्री, खासदार या दरबारात हजेरी लावत आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीत समारोपाची आरती होणार आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी पहिल्याच दिवशीच्या प्रवचनात अद्याप चिकलठाणा विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ का झाले नाही, असा सवाल केला होता.

तसेच इथे उपस्थीत सगळ्या मंत्र्यांनी ते लवकर करावे, पुढच्यावेळी मी जेव्हा इथे येईल तेव्हा मला छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ झालेले दिसले पाहिजे, असे आवाहन केले होते.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनावरून डाॅ. भागवत कराड यांच्यावर टीका केली आहे. जेवढा खर्च बागेश्वर धाम यांच्या कथेवर खर्च केला आहे, तेवढा जर आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांसाठी केला असता तर त्यांची दिवाळी गोड झाली असती, असा टोला लगावला.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT