Pune News : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हाच 'मास्टरमाईंड' असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून होत होता. या पार्श्वभूमीवर वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर देखील मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी जोर धरत होती.
आता वाल्मिक कराडवर देखील पोलिसांनी मकोका लावला आहे. यानंतर बीडमध्ये पोलिसांनी काही ठिकाणी जमाव बंदी लागू केली आहे. तसेच परळी शहरामध्ये दुकान बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणांमध्ये सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बीड मधील खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्या सर्वांना कठोर शिक्षा व्हावी,अशी मागणी केली होती.
त्यानंतर मंगळवारी (ता.14) वाल्मिक कराड याला मकोका लावल्यात आल्यानंतर पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कराड हा पोलीस तपासात दोषी आढळल्याने हा मकोका लागला आहे. खुनाचा कट रचण्यामध्ये त्याचा सहभागी आहेत असं एसआयटीने कोर्टात सांगितला आहे. अस बजरंग सोनवणे म्हणाले.
वाल्मिक कराड याला मकोका लावल्यानंतर परळी शहर बंद ठेवण्यात आल्याच्या बातम्या येत आहेत. याबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले , परळी बंद करण्याचं काम ही मूठभर समाजकंटक करत आहेत. लोकांनी उत्स्फूर्तपणे केलेला हा बंद नाही. पाच-पन्नास पोरं मोटार सायकलवर फिरवून दाब देऊन दुकान बंद करत आहेत . मात्र दडपशाहीने असं कोणी बंद करू शकत नाही. पोलीस अधीक्षक जागृतीने काम करत आहेत असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं.
सोनवणे पुढे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे मास्टरमाइंड सापडला पाहिजे अशी आमची मागणी होती त्याच पद्धतीने आरोपींना पळून जायला कोणी कोणी साथ दिली कट कोणी रचला हे सगळं बाहेर आलं पाहिजे अशी देखील आमची मागणी आहे.
बीडमध्ये काही लोकांमुळे दहशतीचे वातावरण होतं. त्यामुळे लोकांच्या मनात आधी हिंमत नव्हती. आता हिंमत आली असल्याने आता शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रकरण बाहेर आला आहे. पुढील काळात अशी अनेक प्रकरण बाहेर येतील असं सोनवणे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.