Walmik Karad : खंडणीच्या पैशातून वाल्मिक कराडने खरेदी केली महिलेच्या नावे पुण्यात कोट्यावधींची संपत्ती? ED ची एन्ट्री होणार?

Walmik Karad ED Enquiry : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापला आहे. आता या प्ररकरणात अंमलबजावणी संचालनालयाची (सक्तवसुली संचालनालय) एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Suresh Dhas
Suresh DhasSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापला आहे. खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप सातत्याने भाजप आमदार सुरेश धस आणि इतर नेते करत आहेत. तर वाल्मिक कराड आणि गँगने खंडणीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात माया जमवल्याचा देखील आरोप सातत्याने केला जात आहे.

पुण्यात देखील याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती वाल्मिक कराड याने विकत घेतल्या दावा करण्यात येत आहे. तर एका महिलेच्या नावे पुण्यात कोट्यावधींची संपत्ती घेतल्याचाही दावा नेते करत आहेत. आता या प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणेची एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराड यांच्या नावे पुण्यात पाच फ्लॅट आणि सात दुकाने असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता फर्ग्युसन कॉलेज रोडवर वाल्मिक कराड यांनी मोठ्या प्रमाणात संपत्ती घेतली असल्याचं देखील बोललं जात आहे. पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या समोरील इमारतीमध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने तब्बल 25 कोटी रुपये खर्चून 2 ऑफिसची जागा विकत घेतल्याचा दावा करण्यात येत आहे.

Suresh Dhas
Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या भावाने टोकाची भूमिका घेताच CID ने उचललं मोठं पाऊल, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढणार?

या इमारतीमध्ये वाल्मिक कराड याच्याशी संबंधित एक महिला आणि विष्णू चाटे या दोघांच्या नावे 2 ऑफिसची जागा बुक करण्यात आल्या असून त्यासाठी पंचवीस कोटीची रक्कम मोजण्यात अली असल्याचं सांगण्यात येत आहे.

यासंदर्भात वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगने बिल्डरसोबत करार केल्याचं समोर आलं आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा करार पूर्ण होणार आहे. मात्र त्यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणमुळे वाल्मीक कराड यांच्या संबंधित असलेल्या संपत्तीची माहिती गोळा करण्यात येत आहे.

Suresh Dhas
Walmik Karad : "माझ्या लेकाला..."; सुरेश धस, क्षीरसागर अन् बजरंग सोनवणेंवर वाल्मिक कराडच्या आईचा खळबळजनक आरोप

तपासामध्ये या संदर्भातील संपत्ती बाहेर आल्यानंतर या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाची किंवा सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीची एंट्री होण्याची शक्यता आहे. ईडीकडून या सर्व संपत्तींचा हिशोब घेतला जाण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com