Bajrang Sonwane Sarkarnama
मराठवाडा

Bajrang Sonwane Vs Dhananjay Munde : बाबांनो तुमचे हे धंदे बंद करा; बजरंग सोनवणेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा

Pankaja Munde, Pritam Munde : आता खासदार काय असतो हे बीड जिल्ह्याला दाखवून देणार, असा शब्द देत सोनवणेंनी, मागील खासदार कोण होतं हेच कळलं नाही.

Sunil Balasaheb Dhumal

Beed Political News : लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघात झालेल्या आरोप-प्रत्यारोपांनी राज्याचे लक्ष वेधले होते. येथून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे भाजपच्या पंकजा मुंडे यांचा परभाव करून जायंट किलर ठरले. निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सर्व यंत्रणांचा वापर केल्याचा आरोप होत आहे. कोणीतरी म्हणतंय त्यांचा विशिष्ट जातीमुळे पराजय झाला आहे. पण मी तसं म्हणणार नाही, मला सर्वांनी मतदान दिले आहे.

हाणा, मारा, तोडा काहीही करा, पण पंकजाताईंना मतदान करा, असे आमचे भाऊ म्हणाले होते. त्यांची त्याबाबतची रेकॉर्डिंग आहेत. बाबांनो तुमचे हे धंदे बंद करा, अन्यथा बजरंग सोनवणे काय आहे, हे दाखवून देईल, असा थेट इशारा खासदार सोनवणेंनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंना दिला आहे.

खासदार झालेल्या बजरंग सोनवणेंचा Bajrang Sonwane केजमध्ये जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी सोनवणेंनी मुंडे बहीण-भावावर निशाणा साधला. ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील जनतेने कोणाची किती लायकी आहे हे दाखवून दिले आहे. एकट्या बीड तालुक्याने 1 लाखाची लीड दिली.

आता खासदार काय असतो हे बीड जिल्ह्याला दाखवून देणार, असा शब्द देत सोनवणेंनी, मागील खासदार कोण होतं हेच कळलं नाही, असा टोला माजी खासदार प्रीतम मुंडेंना लगावला. बजरंग सोनवणे यांचं काम केलं म्हणून कोणी त्याचे इतर काम बंद केलं असेल तर त्याची नांगी ठेचली जाईल, असा इशाराही त्यांनी दिली.

आज जनतेला वाटतंय, बजरंग सोनवणे म्हणजे मीच आहे. आणि हेच मी पाच वर्षे टिकवणार आहे. बीड जिल्ह्याचा खासदार कोण म्हटलं तर त्याचं नाव बजरंग सोनवणे हेच नाव येते. माझ्या विजयाचे श्रेय शरद पवार Sharad Pawar आणि मनोज जरांगे यांचेच आहे. मात्र मलाच प्रश्न पडला मी खासदार झालो कसा? महिनाभर मला विश्वास बसत नव्हता. मी बायकोला सुद्धा विचारले हे कसं झालं, अशी मिश्किल टिपण्णी सोनवणेंनी केली.

लोकांनी दिलेल्या अधिकारावर कधी कुणाला माज आला नाही पाहिजे, आणि तो माज आम्हाला कधीच आला नाही. शपथ घ्यायच्या अगोदर देशात जर कोणी मिटिंग घेतली असेल तर तो मी आहे. अधिकाऱ्यांना विनंती आहे, ज्याच्या तालुक्यातील काम आहे त्यांना करू द्यावे. आता झाले गेले ते जाऊ द्या. आता बजरंग सोनवणे खासदार झाला आहे. तो तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून बसणार आहे, असे म्हणत सोनवणेंनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

विधानसभेचे तयारी सुरू

खासदार म्हणून तुम्हाला माझी इज्जत ठेवायची असेल, तर बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदार संघात आपले आमदार करायचे आहेत. इच्छुकांची गर्दी झाली असल्याने राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. आता दोन महिने थांबू, मग पाहून कोण आपल्यावर दाबाव टाकतो ते?

निवडणूक आली म्हणून आम्ही विकासकामे करणार नाहीत, आम्ही कायम करणार. लाडकी बहीण योजना काढायची होती तर ती 2 वर्षे अगोदर करायची होती, आता कशासाठी? दुधाला भाव नाहीत, असे म्हणत बीडमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याचे सोनवणेंनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT