Mehboob Sheikh on Bajrang Sonwane : 'दोन कुटाणे करणाऱ्यापेक्षा, दोन कारखानेवाला कधीही बरा' ; मेहबूब शेख यांचा रोख कुणाकडे?

Beed MP Bajrang Sonwane News : 'बजरंगबप्पा तुम्ही अजित पवारांनीही एखाद्या दिवशी खरच सांगा, की दादा मला...' असंही यावेळी मेहबूब शेख यांनी जाहीरपणे सांगितलं आहे.
Mehboob Sheikh on Bajrang Sonwane
Mehboob Sheikh on Bajrang SonwaneSarakarnama

Mehboob Sheikh praised Bajrang Sonawane at Kaij बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा केजमध्ये नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पार्टीचे युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला, शिवाय निवडणूक काळात बजरंग सोनवणे यांची लायकडी काढणाऱ्यांवरही जोरदार टीका केली.

मेहबूब शेख(Mehboob Sheikh) म्हणाले, 'मला बीडची निवडणूक झाल्यावर काही पत्रकारांनी विचारलं, की बीडची लोकसभा निवडणूक कशी झाली? आणि त्यांच तुम्ही थोडक्यात विश्लेषण कसं कराल? मी त्यांना एवढच सांगितलं की, नाइंसाफी के खिलाफ आनेवाले आवाज को चीड कहते है, इन्कलाब की इस सर जमी को बीड कहते है! ज्या ज्यावेळी सत्तेचा उन्माद होतो. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती जाते, अहंकार जातो. त्या त्यावेळी या सत्ताधाऱ्यांना जागा दाखवायला जर कोण क्रांतीकारी पुढे येत असेल तर ती बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता येते.'

Mehboob Sheikh on Bajrang Sonwane
Bajrang Sonawane News : बजरंग सोनवणे, नीलेश लंकेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट!

याशिवाय 'या निवडणुकीत काही लोकांनी बजरंगबाप्पांची लायकी काढली. पण या बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी जनतेनी बजरंग सोनवणेंना राहुल गांधी, सुप्रिया सुळे यांच्या शेजारी उभा करून दाखवून दिलं, त्यांची लायकी काय आहे. शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सगळ्यांना एका मताचा अधिकार दिला आहे. मग त्या झोपडीत राहणाऱ्या गरिबाची लायकीही एका मताची आहे आणि टाटा, बिर्ला, अदाणी, अबानींची लायकीही एका मताचीच आहे.' असं शेख यांनी बोलून दाखवलं.

तसेच, 'सत्ताधाऱ्यांना एवढा अहंकार झाला होता की त्यांना बजरंग सोनवणेंबद्दल काय बोलावं आणि काय नाही. बजरंग सोनवणेंच्या वडिलांकडे बघून वाटतं की नाही ते शेतकरी आहेत, की ते कोणी उद्योगपती आहेत का? पण फक्त बजरंग सोनवणेंनी दोन कारखाने केले, म्हणून बजरंगबाप्पा दोन कारखान्याचे मालक हे शेतकरी पुत्र कसे? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला. त्यावेळी मी केवळ एवढंच सांगितलं, दोन कुटाणे करणाऱ्यापेक्षा दोन कारखानेवाला कधीही बरा.' असा टोलाही यावेळी शेख यांनी विरोधकांना लगावला.

Mehboob Sheikh on Bajrang Sonwane
Bajrang Sonwane News : शपथ घेतल्यानंतर खासदार बजरंग सोनवणेंचं मोठं विधान; म्हणाले, 'बीड जिल्हा शरद पवारांचाच...

याचबरोबर 'ही निवडणूक खरंतर विकासावर लढली गेली पाहीजे. बजरंगबाप्पा तुम्ही पंकजा मुंडेंच्या(Pankaja Munde) विरोधात निवडून आला आहात. पंकजा मुंडे जरी पराभूत झाल्या असल्या तरी त्या मोठ्या राज्याच्या नेत्या आहेत, त्यामुळे तुम्ही जिल्ह्याती बारक्या नेत्यावर टीका करू नका. कारण तुमची लायकी आता अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्याखाली तुम्ही टीकेला येऊच नका. बाकीची टीका खालची लोकं करतील, कारण तुम्ही मोठ्या व्यक्तीचा पराभव करून खासदार झालेला आहात. म्हणून तुम्ही खाली कोणावर टीका करण्याची गरज नाही.' असंही यावेळी मेहबूब शेख यांनी बोलून दाखवलं.

Mehboob Sheikh on Bajrang Sonwane
Bajrang Sonwane : बजरंग सोनवणेंनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकलं; 'या' घटकांना शपथ केली अर्पण

'आता तुमची लायकी वरची आहे आणि अजित पवारांनीही(Ajit Pawar) एखाद्या दिवशी खरच सांगा, की दादा मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी खासदार केलं पण सुनेत्रा वहिनीला मात्र पाडलंय. ही माझी लायकी आहे. मूळात एखादा गरीब कुटुंबात जर जन्माला आला तर मग त्याने खासदार, आमदार व्हायचे स्वप्न बघायचे नाहीत का? त्या निवडणुकी लढायचा अधिकार नाही? तो निवडणूक लढायला लागला तर तुम्ही त्याची लायकी काढणार?' असा संतापही यावेळी मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com