Mumbai News : पंढरपूरच्या वारीसाठी राजकीय नेते दिंड्यांमध्ये सहभागी होऊ लागले आहेत. यंदा राहुल गांधी देखील सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील वारीत सहभागी झाले. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज-काल वारीत हौसे-नवसे-गवसे सहभागी होत असल्याची टिप्पणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टिपणीचा विषय राहुल गांधींकडे वळवला आहे. शरद पवार यांचीही टिप्पणी नेमकी कोणाविषयी होती, याचे संशोधन करत आहे, असे सुनील तटकरे म्हणाले.
खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) सोमवारी विधिमंडळात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल वारीत सहभागी झाले होते. यावर शरद पवार यांनी वारीत हौसे-नवसे-गवसे सहभागी होतात, असा टोला लगावला होता.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. "मी ऐकले आहे, की यंदा राहुल गांधी देखील वारीत सहभागी होत आहेत. शरद पवार यांचा हा शब्दप्रयोग त्यांच्यासाठी आहे की अन्य कोणासाठी आहे याचे मी संशोधन करत आहे. शरद पवार यांच्या विषयी नेहमीच आदराची भूमिका पक्षाची राहिलेली आहे. आज आणि उद्या देखील, अशीच भूमिका राहील, असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.
राज्यातील निमंत्रित 100 कार्यकर्त्यांची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गेल्या आठवड्यात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या. यानंतर सोमवारी मोजक्याच 100 कार्यकर्त्यांना राज्यभरातून बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यात खासदार, आमदार, माजी आमदार आणि काही प्रमुख नेते असणार आहेत.
आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती यामध्ये असेल. त्यासोबतच राज्य सरकारने या अधिवेशनात जाहीर केलेल्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम घेण्याचे नियोजन असणार आहे. याच वेळी निमंत्रित 100 कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात आणि विस्तारासंदर्भात काही मते जाणून घेणार आहोत. त्यानंतर पुढील कार्यक्रम आखून राज्यभर पक्षाच्या वतीने कार्यक्रम हाती घेतले जातील, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
महायुतीच्या नऊ जागा निवडून येणार
विधान परिषदेला महायुतीचे नऊ उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी ज्या-ज्या पक्षांवर देण्यात आली आहे. महायुतीचे विधान परिषद निवडणुकीत नऊ उमेदवार विजयी होतील. कोणत्याही आमदाराला 'फाईव्ह स्टार'ची सोय केलेली नाही. आम्ही जमिनीवर आहोत, जमिनीवरच राहू, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.