Sharad Pawar Rally News, Beed Sarkarnama
मराठवाडा

Sharad Pawar Rally In Beed : कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या.. ; शरद पवारांची तोफ धडाडण्यापूर्वीच मुंडे समर्थकांकडून बॅनरबाजी

Maharashtra Politics : . "शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा सत्कार करणार,"

सरकारनामा ब्यूरो

Beed : 'माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार,' असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला दिला आहे. पवारांचा हा इशारा धुडकावत बीडमध्ये राष्ट्रवादीचे नेते, (अजित पवार गट) मंत्री धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे. "कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या," अशी विनंती मुंडे समर्थकांनी केली आहे. "शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा सत्कार करणार," असे बॅनरवर म्हटले आहे.

आज (गुरूवार) बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. राष्ट्रवादीतील उभ्या फुटीनंतर अजित दादा पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथील सभेनंतर आता दुसरी सभा धनंजय मुंडे यांच्या होमपीचवर होत आहे. ही सभा महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

पवारांच्या सभेनंतर बीडमध्ये 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवारांची उत्तर सभा होणार आहे. त्यामुळे सभेत शरद पवार काय बोलणार आणि अजित पवार त्याला उत्तर काय देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उत्तर सभेचे आयोजन धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

आजच्या सभेपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे. सभेसाठी शरद पवार हे छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी साडेनऊ बीडकडे प्रयाण करणार आहेत

साडेबारा वाजता ते बीड शहरात दाखल होणार आहेत. महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी जाहीर सभेतून पवार विरोधकांवर तोफ डागणार आहेत.सायंकाळी चार वाजता ते बीड येथून छत्रपती संभाजीनगर निघणार आहेत.सभेतून शरद पवारांच्या निशाण्यावर कोण असणार? ते हे नेमकं काय बोलणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT