MLA Suresh Dhas Sarkarnama
मराठवाडा

Beed crime : महिलेला विवस्त्र करून मारहाण; सुरेश धस यांच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा

सरकारनामा ब्यूरो

Beed Crime News : जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार वाळुंजमध्ये उघडकीस आला आहे. इतकेच नव्हे तर, संबंधित पीडित महिलेला आणि तिच्या पतीला जातीवाचक शिवीगाळही करण्यात आली. या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यासह तिघांवर आज (ता.२१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके काय घडले ?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (ता. १५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी संबंधित पीडित महिला, त्यांचे पती आणि सून असे तिघेजण बैलगाडी घेऊन शेतात गेले होते. पती व सून शेतात फेरा करायला गेले असताना त्या ठिकाणी रघु कैलास पवार व राहुल माणिक जगदाळे हे अचानक पीडित महिलेसमोर आले आणि रघु पवारने त्यांना धक्का दिला आणि त्या जमिनीवर कोसळल्या. राहुल जगदाळे याने त्यांचे पाय धरून ओढले. याचवेळी त्यांनी आरडाओरडा केला. हा सर्व प्रकार प्राजक्त धस यांच्यासमोरच सुरू होता.

रघु पवार आणि राहुल जगदाळे झटापटीत साडी ओढली. पीडीि महिलेने आरडाओरड केली. पत्नीचा आवाज ऐकून पती आणि त्यांची सून तेथे आले, त्यांना पाहून राहुल जगदाळे मक्यात पळून गेला. तर, महिलेच्या सुनेने रघू पवारला पळताना त्याचे मोबाईलमध्ये शुटींग केले. त्यानंतर महिलेच्या पतीने आमदार सुरेश धस यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांना जाब विचारला असता त्यांनी ही जमीन माझी असून, रघू पवाराला मी बटईने दिल्याचा दावा केला. (Beed News)

दुसरीकडे, या सर्व घटनेबाबत संबंधित महिलेच्या सुनेने पोलिसांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती दिली. अर्ध्या तासातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राजक्ता धस यांनी सोबत आणलेले 20 ते 25 गुंड आणले होते. बैलगाडीत भरलेला मका खाली करून रघू पवारने तुझे अख्खे कुटुंब याच वावरात पुरीन अशी धमकी दिली. तर, प्राजक्ता धस यांनीही या जमिनीवर तसेच तहसीलमध्ये माझे नाव आहे. तुम्ही मका कसे घेऊन जाता ते बघतेच मी, अशी धमकी दिली, असे पीडित कुटूंबियांनी पोलिसांकडे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

पोलिसांसमोर घडला प्रकार

दरम्यान, दीड महिन्यापूर्वी देखील महिलेच्या कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून राहुल माणिक जगदाळे, रघु कैलास पवार, दादा दगडू शिराळे यांनी जीवे मारण्याच्या धमकी यांनी दिली होती. त्यावेळी न्यायालयाने आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

यानंतर रविवारी (15 ऑक्टोबर) पीडित कुटूंब पुन्हा शेतात आले. पण, 'तुम्ही पारध्याचे असताना तुमची एवढी हिंमत कशी झाली, अशी धमकीही देण्यात आली. पोलिस आल्यामुळे त्यांना आमच्यावर हल्ला करता आला नाही. त्यांनी हल्ल्याचे पूर्ण नियोजन केले होते. प्राजक्ता धस यांच्या सांगण्यावरुनच हा सर्व प्रकार घडला. रघु पवार व राहुल जगदाळे यांनी माझे कपडे काढून माझा विनयभंग केला. मी आष्टीच्या सरकारी रुग्णालयात गेल्यावर मला नगर शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले, हा प्रकार पोलिसांसमोर घडल्याचे महिलेने फिर्यादीत नमूद केले आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT