Beed Bazar Samiti Result :  Sarkarnama
मराठवाडा

Beed Bazar Samiti Result : महाविकास आघाडी तीन, तर भाजपकडे अवघी एकच बाजार समिती; काय सांगतोय बीडचा निकाल?

Beed Bazar Samiti Result : दिग्गजांना धक्का, महाविकास आघाडीचा डंका..

Chetan Zadpe

Beed Bazar Samiti Result : बीड जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय हादरा देणारा निकाल लागला आहे. भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या मतदार संघातील गेवराईत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांच्या आघाडीने एकतर्फी व मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर, अंबाजोगाईतही महाविकास आघाडीने बाजी मारली.

जिल्ह्यात एकूण नऊ बाजार समित्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यातील कडा बाजार समिती भाजप आमदार सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीलाच बिनविरोध झाली. तर, वडवणी, केज, परळी, अंबाजोगाई, बीड व गेवराई बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान झाले. सुरूवातीलाच वडवणीत राष्ट्रवादी प्रणित आघाडीने भाजप आघाडीला धुर चारली.

शनिवारी बीड, केज, परळी, अंबाजोगाई व गेवराईचे निकाल जाहीर झाले. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेंचे होमपिच असलेल्या परळीत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा मोठ्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने या ठिकाणी सर्वच जागा जिंकत बाजी मारली. परळी विधानसभेचे कार्यक्षेत्र असलेल्या अंबाजोगाईत देखील महाविकास आघाडीने १८ पैकी १५ जागा जिंकल्या आहेत. भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे अंबाजोगाई होमपिच आहे.

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची ४० वर्षांपासूनची सत्ता उलथण्यात परिवर्तन महाआघाडीला यश आले. माजी मंत्री क्षीरसागरांनी भाजप आमदार लक्ष्मण पवारांची मदत घेतली. तर, विरोधात आमदार संदीप क्षीरसागर, भाजप, शिवसंग्राम, शिवसेना, शिवसेना (उबाठा) एकत्र आले आणि १८ पैकी १५ जागा जिंकल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT