Sangeeta Thombre Sarkarnama
मराठवाडा

Beed Eknath Shinde Shiv Sena entry : म्हणे मुंडेंच्या खास, पण शिंदेंकडे वळल्या! बीड 'झेडपी'साठी मोठा राजकीय डाव

Pankaja Munde Close Aide Sangeeta Thombre Joins Eknath Shinde Shiv Sena : भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू सहकारी माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी एकनाथ शिंदे शिवसेनेत प्रवेश केल्याने बीडच्या राजकारण फिरलं आहे.

Pradeep Pendhare

Sangeeta Thombre joins Shiv Sena : एकनाथ शिंदे यांची शिवसेना 24 तास राजकारण कसं करावं याचा धडा देत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपला टक्कर देण्यासाठी, महापौरपद खेचून आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे तीन नगरसेवक फोडल्याची चर्चा सुरू असतानाच, बीडमध्ये 'झेडपी'साठी एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय डाव टाकला आहे.

भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या एकेकाळच्या विश्वासू सहकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर बीड (Beed) जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या मध्यस्थीने संगीता ठोंबरे यांचा हा प्रवेश झाला आहे. संगीता ठोंबरे यांच्या या निर्णयामुळे बीडच्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेची ताकद वाढण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

संगीता ठोंबरे या भाजपमधील मंत्री पंकजा मुंडे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जात होत्या. केज मतदार संघातून संगीता ठोंबरे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत भाजपने (BJP) त्यांच्या ऐवजी नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली. त्यामुळं त्या नाराज झाल्या होत्या.

2024 च्या विधानसभा निवडणुकीत देखील भाजपकडून नमिता मुंदडा यांना उमेदवार देण्यात आली. त्यामुळे संगीता ठोंबरे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्या मध्यस्थीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. आता बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी संगीता ठोंबरे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा सुरू आहे.

विधानसभेतून माघार, अन् शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!

2024च्या विधानसभा निवडणुकीत, केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा यांना भाजपकडून उमेदवारी केली. या मुळे नाराज असलेल्या भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी, संगीता ठोंबरे यांनी उमेदवारी मागे घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला.

ठोंबरेंची बीड 'झेडपी'साठी मोठी खेळी...

संगीता ठोंबरे यांनी आगमी राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेत, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का दिला आहे. तसंच संगीता ठोंबरे या भाजप मंत्री पंकजा मुंडे यांच्या विश्वासू मानल्या जातात. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. घरवापसीची चर्चा असतानाच, संगीता ठोंबरे यांनी मोठी खेळी करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT